मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:35 PM2020-08-26T17:35:12+5:302020-08-26T17:35:25+5:30

पालकमंत्र्यांना दिले पत्र

4 FSIs should be sanctioned with KDM on the lines of Mumbai Municipal Corporation; Congress demand | मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी 

मुंबई मनपाच्या धर्तीवर केडीएमसीत 4 एफएसआय ला मंजूरी द्यावी; काँग्रेसची मागणी 

Next

डोंबिवली: महानगरपालिका क्षेत्रातील ३० ते ४५ वर्षांपासून जुन्या इमारतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ४ चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) संदर्भात आपल्या दालनात बैठक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली.

महानगरपालिका अस्तित्वात येण्या अगोदर येथे ग्रामपंचायत राजवट होती. परिसरातील भुमिपुत्र शेतकरी बांधव शेती करून आपला उदर निर्वाह चालवीत होते. त्याच बरोबर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना घर मिळावा व आपल्या कुटुंबाचाही उदर निर्वाह चालवावा म्हणून त्याकाळात अल्पदरात सामान्य माणसांना परवडणारी घरे भाडेतत्वावर बांधून देण्यात आली. त्यानंतर १९८३ ला महानगर पालिका अस्तित्वात आली त्यावेळी १९८३ ते १९९५ पर्यंत प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९५ साली महापालिकेची प्रथम निवडणूक झाली. त्यावेळी आपल्या शहराचा विकास व्हावा म्हणून परिसरातील आगरी कोळी भूमिपुत्रांनी आपल्या जमीनी विविध आरक्षणा साठी दिल्या.

त्यातून रस्ते, मध्य रेल्वे, दिवा वसई रेल्वे, बागबगीचे, खेळाचे मैदान, शाळा कॉलेज, पाणीपुरवठा योजना, विद्युत पुरवठा, औधोगिक विकास (एम. आय. डी.सी.), सी. आर. झेड., बफर झोन तसेच आताचे रेल्वे प्रलंबित कॉरिडॉर, माणकुली ते शीळ फाटा बायपास रस्ता (रिंगरूट) तसेच विविध विकास कामासाठी आगरी कोळी भूमिपुत्रांच्या जमिनी आरक्षित केल्यामुळे मूळचा आगरी कोळी भुमिपुत्र भुमिहीन झाला असून त्यावर उध्वस्त होण्याची वेळ आल्याचे केणे म्हणाले.

महापालिका क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्र हा महत्वाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत काळापासून ते आजपर्यंत सुमारे ३० ते ४५ वर्षांपासून उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारती आता धोकादायक परिस्थिती मध्ये आहेत सदर इमारतीला सुमारे दोन, अडीच चटईक्षेत्र वापरण्यात आले आहे. परंतु महापालिकेच्या नियमा प्रमाणे सध्या एक चटई क्षेत्र (एफ. एस. आय.) देण्यात येत आहे. तसेच जुन्या व धोकादायक बांधकामांना सध्याच्या अटी व शर्ती प्रमाणे जमीन मालक यांना मोबदलाही मिळत नाही व तेथे राहत्या रहिवाश्याना घरे देणेही शक्य होत नाही. असाच प्रश्न बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्माण झाला होता. त्याला उपाय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गरजा समजून त्यांना न्याय देण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) मंजूर करून दिले व जमीन मालक व रहिवाश्यांचा प्रश्न सोडवला.

त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढीव चटई क्षेत्रला (४ एफ. एस. आय.) मंजुरी मिळावी जेणे करून जमीन मालकाला (घरमालक) त्याचा मोबदला मिळेल व राहत्या रहिवाश्याना त्यांचे घर मिळेल. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये उत्पन्नाची भर होईल व सरकारी जमिनीवरील महसूल शासनाला मिळेल. या आधीही तत्कालीन मुख्यमंतत्री देवेंद्र फडणवीस यांना २४/१२/२०१८ व २५/०६/२०१९ रोजी सदर मागणी संदर्भात निवेदन दिले होते. तसेच विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही १७ डिसेंबर ही निवेदन दिलेल आहे. परंतु नगरविकास विभागाचे मंत्री शिंदे असल्याने त्यांच्यासोबत चर्चा होणे गरजेचे आहे.तरी सदर अर्जाचा गांभीर्यपूर्वक विचार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ४ चटई क्षेत्र (४ एफ. एस. आय.) मंजूर करून जमीन मालक (घरमालक) व रहिवाश्याना योग्य न्याय मिळवून द्यावा असे केणे म्हणाले

Web Title: 4 FSIs should be sanctioned with KDM on the lines of Mumbai Municipal Corporation; Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.