सेंच्युरी रेयॉनमध्ये टँकरच्या स्फोटात ४ ठार; मृतदेह ओळखणे झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 08:00 AM2023-09-24T08:00:07+5:302023-09-24T08:00:36+5:30

शहाडमधील दुर्घटनेत ६ जखमी, मृतदेह ओळखणे झाले कठीण

4 killed in tanker explosion in Century Rayon; It became difficult to identify the bodies | सेंच्युरी रेयॉनमध्ये टँकरच्या स्फोटात ४ ठार; मृतदेह ओळखणे झाले कठीण

सेंच्युरी रेयॉनमध्ये टँकरच्या स्फोटात ४ ठार; मृतदेह ओळखणे झाले कठीण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कारखान्यात शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजता नायट्रोजन गॅस टँकरचा जबरदस्त स्फोट होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील इमारती हादरल्या. चार मृतांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. स्फोट झालेल्या टँकरच्या ठिकाणी मांसाचा सडा पडल्याचे भयानक चित्र होते. कंपनीकडून या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. १ शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी कंपनीतील एका प्लॅंटमध्ये गुजरात येथून नायट्रोजन गॅसचा टँकर आला होता. त्यात कार्बनडाय सल्फर भरण्यात येणार होता. त्याची तपासणी सुरू असताना मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, संपूर्ण परिसर हादरला. शहाड व आजूबाजूच्या तानाजीनगर, गुलशननगर, धोबी घाट,  शिवनेरीनगर परिसरातील घरांना हादरे बसले. येथील इमारतींमधील रहिवासी भीतीने रस्त्यावर आले. सेंच्युरी कंपनीत स्फोट झाल्याचे समजताच लोक धावत कंपनीच्या दिशेने निघाले. 

मृतांचे नातलग, जखमींना मदत
सेंच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी कंपनीमधील स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण बेपत्ता असल्याचे सांगितले. सहा जण जखमी झाले आहे. मृतांच्या नातलगांना व जखमी कामगारांना कंपनीकडून मदत देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. स्फोटाची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

मृत आणि जखमींची नावे
nस्फोटात टँकरचा चालक पवन यादव आणि प्लॅंटमधील हेल्पर अनंत डिंगोरे यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यांचे मृतदेह न मिळाल्याने बेपत्ता घाेषित केले. 
nगंभीर जखमी शैलेश यादव आणि राजेश श्रीवास्तव या दोघांचाही मृत्यू झाला. स्फोट झालेल्या टँकरशेजारी युरेका कंपनीचा टँकर उभा होता. 
nटँकर चालक पंडित लक्ष्मण मोरे आणि क्लिनर हंसराज चरोत यांच्यासह सेंच्युरी कंपनीचे कामगार सागर झालटे, अमित भरनुके, प्रकाश अनंत निकम, मोहम्मद अरमान असे सहा जण जखमी झाले आहेत. 

नातेवाईक, नागरिकांची गर्दी
nकंपनीत स्फोट झाल्याची माहिती कामगारांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी व स्थानिक नागरिकांनी कंपनी प्रवेशद्वार आणि रुग्णालयात गर्दी केली होती. कंपनीने सर्व परिसर सील केल्यामुळे कुणालाही अपघातस्थळी सोडण्यात येत नव्हते. 
nपोलिसांनीही या परिसरात कडेकोट 
बंदोबस्त ठेवला होता. 
nतर आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह भाजपचे शहाराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, नाना बागुल यांच्यासह स्थानिक नेत्यांनी जखमींची विचारपूस केली.

Web Title: 4 killed in tanker explosion in Century Rayon; It became difficult to identify the bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.