उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलीवर नातेवाईकडून अत्याचार, आरोपीला अटक, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 8, 2025 14:49 IST2025-04-08T14:48:45+5:302025-04-08T14:49:52+5:30
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर शहर पूर्वेत राहणाऱ्या ४ वर्षाच्या चिमुरडीवरजवळच्या नातेवाईकाने अत्याचार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

उल्हासनगरात ४ वर्षाच्या मुलीवर नातेवाईकडून अत्याचार, आरोपीला अटक, गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहर पूर्वेत राहणाऱ्या ४ वर्षाच्या चिमुरडीवरजवळच्या नातेवाईकाने अत्याचार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
उल्हासनगर पूर्वेत राहणारी ४ वर्षाची मुलगी रडत असल्याने, आईने मुलीला विश्वासात घेऊन बोलते केले असता, मुलीने तीच्या सोबत घडलेला प्रकार अडखळत आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचे आईच्या लक्षात आल्यावर, आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला. आरोपीने गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून शनिवारी गुन्हा घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कस्टडी दिली असून अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.