सामाजिक न्याय भवनचे ४ वर्षांत केवळ फाउंडेशनचेच बांधकाम

By admin | Published: February 2, 2016 03:57 AM2016-02-02T03:57:58+5:302016-02-02T03:57:58+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या कामास २०११पासून प्रारंभ झाला. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीत या इमारतीच्या फाउंडेशनचे काम मागील

In the 4 years of social justice building only the foundation of the foundation | सामाजिक न्याय भवनचे ४ वर्षांत केवळ फाउंडेशनचेच बांधकाम

सामाजिक न्याय भवनचे ४ वर्षांत केवळ फाउंडेशनचेच बांधकाम

Next

सुरेश लोखंडे,  ठाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या कामास २०११पासून प्रारंभ झाला. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीत या इमारतीच्या फाउंडेशनचे काम मागील एक महिन्यापासून सुरू झाले आहे. दुर्लक्षितपणामुळे विलंबास होत असतानाही ‘कामांना सुरुवात झाली हे महत्त्वाचे’ असे सांगून समाजकल्याण सहायक आयुक्त उज्ज्वला सपकाळे यांनी निष्काळजीपणवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे.
शासनाकडून जागा प्राप्त होऊनही पाच वर्षांत इमारतीच्या केवळ फाउंडेशनचे काम सुरू झाले आहेत. १० हजार स्क्वेअर फुटांची ही इमारत तळ मजला वगळता चार मजल्यांची बांधली जाणार आहे. त्यासाठी ८ कोटी रुपये खर्चाची तरतूदही आहे. प्लॅन मंजुरीसाठी सतत अडथळा आल्याचे कारण समाजकल्याण विभागाकडून नमूद करण्यात आले. राज्यात सुमारे ३३ ठिकाणी सामाजिक न्याय भवन उभारण्यात येत आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्याचे न्याय भवन कळवा येथील सुमारे अडीच एकर जागेत उभे करण्याच्या कामास २०११मध्ये सुरुवात झाली. सुमारे २४ महिन्यांच्या (दोन वर्षे) कालावधीत ही इमारत उभी राहणे आवश्यक होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही विलंब झाल्याचे सांगण्यात आले. न्याय भवनच्या पूर्णत्वाच्या कामाने गती न घेतल्यास काही संघटना आंदोलन छेडण्याच्या प्रयत्नात आहेत.

Web Title: In the 4 years of social justice building only the foundation of the foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.