चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:12 AM2022-08-21T07:12:52+5:302022-08-21T07:14:43+5:30

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

402 patients of swine flu in Thane district 52 new patients in three days five deaths | चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

Next

ठाणे :

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४०२ वर, तर मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. 

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३५० होती. जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत ५२ ने वाढ झाल्याने रुग्णांची संख्या ४०२ झाली. स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, कोरोनासह स्वाइन फ्लूचा मुकाबला करावा लागणार आहे. 

मागील तीन दिवसांत ठाणे महापालिका हद्दीत ३९ रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांची संख्या २९१ वर गेली असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या आठ झाली. 



१७० रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात सध्या ४०२ रुग्णांची नोंद केली आहे. यापैकी १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित २१८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

केडीएमसीत रुग्ण संख्या ५६ तर दोघांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबई ३३, मीरा-भाईंदर सहा, ठाणे ग्रामीण चार, बदलापूर आठ, अंबरनाथमध्ये एक रुग्ण आढळला आहे.

Web Title: 402 patients of swine flu in Thane district 52 new patients in three days five deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.