ठाणे जिल्ह्यात नव्याने ४११ कोरोना रु ग्णांची नोंद: सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 09:25 PM2020-12-13T21:25:50+5:302020-12-13T21:26:43+5:30
जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी १२२ बाधितांची तर तिघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ४२५ तर एक हजार २७१ जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यापाठोपाठ नवी मुंबईमध्ये ८० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी ४९ हजार ६५३ इतकी बाधितांची तर एक हजार १४ मृत्युची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीमध्ये १०८ नविन रुग्ण दाखल झाले असून एकाचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ५५ हजार ७५१ तर मृतांची संख्या एक हजार ८१ इतकी झाली. मीरा भार्इंदरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ हजार ४५३ तर मृतांची संख्या ११० इतकी झाली. भिवंडी निजामपुर महापालिका क्षेत्रात चार नविन रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ३६२ तर मृतांची संख्या ३४८ इतकी स्थिर राहिली आहे. उल्हासनगरमध्ये पाच रु ग्णांच्या नोंदीमुळे बाधितांची संख्या ११ हजार १५९ झाली असून मृतांची संख्या ३५६ इतकी स्थिर राहिली. अंबरनाथमध्येही १६ रु ग्णांच्या नोंदीमुळे आठ हजार ८६ इतकी बाधितांची संख्या झाली. तर बदलापूरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ ४५३ तर मृतांची संख्या ११० झाली. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागात १७ रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ४६७ झाली असून मृतांची संख्या ५७१ इतकी स्थिर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.