ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४१६ रुग्ण सापडले; ९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:58 PM2020-12-24T19:58:05+5:302020-12-24T19:58:15+5:30

Corona News thane : उल्हासनगरत १४ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत ११ हजार २८२ झाले असून ३५७ मृत्यू संख्या आहे. भिवंडीला सात बधीत आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही.

416 corona patients found in Thane district; 9 died | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४१६ रुग्ण सापडले; ९ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४१६ रुग्ण सापडले; ९ जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी ४१६ रुग्णांची वाढ झाली असून  नऊ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ४० हजार ६१९ रुग्ण नोंदल्या गेले आहेत. तर, मृतांची संख्या पाच हजार ९१० झाली आहे. 

     ठाणे शहरातून आज ९६ रुग्णांची नोंद झाली असता आता या शहरात ५४ हजार ६७१ बाधीत रुग्ण नोंदले आहेत. तर, तीन मृत्यू झाल्याने येथील  मृतांची संख्या एक हजार २९७  झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ११८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात ५५ हजार ८६७ बाधीत झाले असून एक हजार ९४ मृत्यूची नोंद झाली आहे.


     उल्हासनगरत १४ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत ११ हजार २८२ झाले असून ३५७ मृत्यू संख्या आहे. भिवंडीला सात बधीत आढळून आले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत सहा हजार ४२१ असून मृतांची संख्या ३५१ आहे. मीरा भाईंदरमध्ये आज ४४ रुग्णांची, तर एका मृताची नोंद आहे. या शहरात आता बाधितांची २५ हजार २१२ झाली असून मृतांची संख्या ७८१ आहे. 


     अंबरनाथमध्ये १२ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या आठ हजार १९७ असून मृत्यू २९९ नोंदले आहेत. बदलापूरला १३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधीत आठ हजार ७३६ झाले आहेत.या शहरात आज एक मृत्यू असून ११४ मृत्यूची नोंद झाली  आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात २० रुग्णांची नोंद असून एका मृत्यूची नोंद आहे. या परिसरात आता बाधीत १८ हजार ६८९ आणि मृत्यू ५७८ आहेत.

Web Title: 416 corona patients found in Thane district; 9 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.