ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अॅपला ४२ हजार ७५१ नागरीकांनी दिला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:06 PM2018-01-18T15:06:48+5:302018-01-18T15:09:53+5:30
उशिराने का होईना ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अॅपला ठाणेकरांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ७५१ नागरीकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. तर हजारो नागरीकांनी पालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे - स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे महापालिकेला अद्याप स्वच्छता अॅपचा टारगेट पूर्ण करण्यापर्यंत मजल मारता आलेली नसल्याची वास्तव समोर आले होते. परंतु आजच्या घडीला ठाणे महापालिकेच्या या स्वच्छता अॅपवर ४२ हजार ७५१ नागरीकांनी प्रतिसाद दिला आहे. तर यातील ३३ हजार २९१ नागरीक हे त्यात अॅक्टीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने या अॅपच्या सर्व्हेत २७ वरुन १८ पर्यंत मजल मारली आहे. आता येत्या काही दिवसात पहिल्या १० मध्ये आम्ही येऊ असा दावा देखील पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे.
स्वच्छता अॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबविणाºया ठाणे महापालिकेला या अॅप बाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याची माहिती डिसेंबरच्या अखेरीस समोर आली होती. डिसेंबर अखेर पर्यंत ४० हजार नागरीकांची नोंदणी अपेक्षित असतांना हे अॅप केवळ २४ हजार नागरीकांनीच डाऊनलोड केल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता डिसेंबर अखेरची तारीख आता ३१ जानेवारी करण्यात आली असून आम्ही अपेक्षित असलेले टारगेट अॅच्हीव केले असल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. या अॅपची जनजागृती स्वत:च्या कर्मचाऱ्यांपासून पालिकेने केली होती. जर ४० हजार नागरिकांनी हा अॅप डाउनलोड केला तर १५० गुण ठाणे महापालिकेला मिळाणार आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरातील मॉल, हॉस्पिटल तसेच सर्व पालिका कर्मचाºयांना हा अॅप डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहीत केले होते. जनाग्रह अॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यानुसार १७ जानेवारी पर्यंत हा अॅप डाऊनलोड करण्यांचा आकडा हा ४२ हजार ७५१ एवढा झाला असून या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या ही ३३ हजार २९१ एवढी आहे. तर ९ हजार ४६० नागरीकांनी हा अॅप केवळ डाऊनलोड केला आहे. तर या अॅपवर आलेल्या २८ हजार ५०२ तक्रारींपैकी २६ हजार ५५६ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर १ हजार ९४१ तक्रारी या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या अॅपमुळे ६ हजार ७७० नागरीकांपैकी ६ हजार १९८ नागरीकांनी पालिकेने केलेल्या कामाला समाधान व्यक्त केले आहे. तर केवळ ४२४ नागरीकांनी असाधान व्यक्त केले आहे. समाधान व्यक्त करण्यांची टक्केवारी ही ९१.६ टक्के एवढी आहे. पालिकेने केलेल्या या कामामुळेच २० डिसेंबर रोजी पालिका या अॅपच्या सर्व्हेत २७ व्या क्रमांकावर होती. आज तोच क्रमांक १८ वर आला असून येत्या काही दिवसात आम्ही पहिल्या १० मध्ये येऊ असा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला आहे. तर केलेल्या कामांचे आतापर्यंत ४ हजार २९ गुण पालिकेला मिळाले आहेत.
- केंद्र शासनामार्फत आपले शहर स्वच्छ आहे किंवा कसे यासाठी १९६९ या टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. या क्रमांकावर कॉल करुन, रजिस्ट्रेशन केल्यानंतर समोरुन एक कॉल नागरीकांना येतो, त्यात शहर स्वच्छेताबाबत आपण समाधानी आहात का?, कचरा नियमित उचलला जातो का? आदींसह इतर सहा प्रश्न विचारले जातात. विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिल्यास त्याचेही गुण ठाणे महापालिकेला मिळणार आहेत.