पालिकेच्या उत्पन्नात ४२६ कोटींची वाढ

By admin | Published: February 7, 2016 02:31 AM2016-02-07T02:31:45+5:302016-02-07T02:31:45+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा तब्बल ४२६ कोटींची वाढ झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक विभागाला दिलेले लक्ष्य आणि त्यानुसार तितक्याच तत्परतेने अधिकारी

426 crores increase in municipal income | पालिकेच्या उत्पन्नात ४२६ कोटींची वाढ

पालिकेच्या उत्पन्नात ४२६ कोटींची वाढ

Next

ठाणे : मागील वर्षीच्या तुलनेत ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात यंदा तब्बल ४२६ कोटींची वाढ झाली आहे. आयुक्तांनी प्रत्येक विभागाला दिलेले लक्ष्य आणि त्यानुसार तितक्याच तत्परतेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका, यामुळे पालिकेची आर्थिक नाडी रुळांवर येऊ लागली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी दोन महिने शिल्लक असल्याने या काळात आणखी २०० कोटींची वाढ करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.
एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेची आर्थिक बाजू कोलमडली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेत ठेकेदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. निधी मिळत नसल्याने नगरसेवकही तोंडसुख घेत होते. परंतु, याच कालावधीत पालिकेची सूत्रे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हाती घेतली. हळूहळू का होईना, त्यांनी उत्पन्नाच्या इतर स्रोतांकडे लक्ष केंद्रित करून प्रत्येक विभागाला टार्गेट देऊन पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार, या वर्षी जानेवारीअखेर पालिकेचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत ४२६ कोटींनी वाढले आहे. विशेष म्हणजे पालिकेने मागील महिन्यापासून वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये मुंब्य्रातून एकाच दिवसात १ कोटीहून अधिक वसुली झाली. या मोहिमेला काँग्रेसने विरोध केला असला तरी ती सुरूच राहणार असल्याचा निर्धार पालिकेने केला. त्याचा परिणाम म्हणून आता १० महिन्यांतच विक्रमी वसुली केली गेली.
१ एप्रिल ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान पालिकेच्या तिजोरीत १०२० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले. परंतु, यंदा याच कालावधीत ते १४४६ कोटींवर नेले आहे. विशेष म्हणजे एलबीटी बंद झाल्यानंतरही या विभागाकडून आतापर्यंत ४४९ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)

एक वर्षात असे वाढले उत्पन्न
विभागाचे नाव१ एप्रिल ते १ एप्रिल ते झालेली वाढ
३१ जाने. २०१५३१ जाने. २०१६
मालमत्ता कर२०४.६२ कोटी२३२.४७२७.८५ कोटी
स्थानिक संस्था कर३३०.५८४४९.९८११९.४०
स्टॅम्प ड्युटी व इतर११२.४८९१.९३-२०.५५ कोटी
शहर विकास विभाग१९७.०४३५६.१०१५९.०६
पाणीपुरवठा विभाग५२.७९६१.८७९.०८
जाहिरात विभाग५.२२७.५०२.२८
सार्वजनिक बांधकाम५२.७८१२०.३०६८.१९
अग्निशमन दल४२.३५३६.६६-५.६९
स्थावर मालमत्ता२.०५४.०२२.०२
घनकचरा२०.२०२४.६२५.४२
एकूण१०२०.१९ कोटी१४४६.५१ कोटी४२६.३२ कोटी

Web Title: 426 crores increase in municipal income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.