ठाणे जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायती बिनविराेध; आठ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी नाही!
By सुरेश लोखंडे | Published: October 26, 2023 06:44 PM2023-10-26T18:44:49+5:302023-10-26T18:46:09+5:30
जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती ग्रामीण व दुर्गम भागात सक्रीय आहे.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यातील १३१ ग्राम पंचायतींच्या निवडणुका व पाेटनिवडणुकांसाठी ५ नाेव्हेंबरराेजी मतदान आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागवून छाननी करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतले असता तब्बल ४३ ग्राम पंचायती बिनविराेध निवडून आल्या. यामध्ये १२ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक तर ३१ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुका ह्या बिनविराेध झाल्याचे उघड झाले. यावेळी मात्र एक ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व सातच्या पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाही.
जिल्ह्यातील ४३१ ग्राम पंचायती ग्रामीण व दुर्गम भागात सक्रीय आहे. त्यापैकी ६१ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका हाती घेतल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी मागवण्यात आली असता २६५ जणांनी सरपंच पदासाठी तर एक हजार ३१६ जणांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले. मात्र छाननीमध्ये एकूण ३७ सदस्यांचे व सरपंच पदाच्या तीन जणांचे नामनिदेर्शनपत्र बाद झाले आहे.
शिल्लक राहिलेल्यापैकी ११० जणांनी सरपंच पदाचे उमेदवारी मागे घेतली तर ३८९ जणांनी सदस्य पदाची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे या पंचवार्षिक निवडणुकीच्या १२ ग्राम पंचायती बिनविराेध निवडणून आलेल्या आहेत. यामध्ये दहा मुरबाड तालुक्यातील तर दाेन भिवंडीमधील आहेत. उर्वरित फक्त ४८ ग्राम पंचायतींसाठी १३५ सरपंच पदासाठी तर ७१५ सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरीत फक्त एका ग्राम पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
या वेळी ७० ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुकासाठी उमेदवारी दाखल झाली असता माघारीनंतर ३१ ग्राम पंचायती बिनविराेध आलेल्या आहेत. तर सात ग्राम पंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. ठाणे तालुक्यातील दाेन ग्राम पंचायतींच्या दाेन सदस्य रिंगणात आहेत. भिवंडीच्या चार सरपंच पदासाठी एकही अर्ज आलेला नाही. तर तीन जागांवरील सदस्य बीनविराेध विजयी झाले असून ११ छाननीत बाद झालेे तर एकाने उमेदवारी मागे घेतली आहे. याप्रमाणेच शहापूरच्या ४० ग्रामच्या पाेटनिवडणुकीपैकी २२ ग्राम पंचायती बिनविराेध झाल्या असून सात जागांसाठी एकही अर्ज नाही. मुरबाडच्या १३ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुकांमध्ये पाच बिनविराेध आल्या. तर दाेन सदस्य रिंगणात आहे. अंबरनाथला एक ग्राम पंचायत बिनविराेध असून चार सदस्य रिंगणात आहेत.