४३ ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत ५ टक्के निधी

By admin | Published: November 14, 2015 11:23 PM2015-11-14T23:23:44+5:302015-11-14T23:23:44+5:30

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना ५ टक्के थेट निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार विक्रमगड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या खात्यात हा निधी जमा झाला

43 panchayats have 5 percent funding under PESA | ४३ ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत ५ टक्के निधी

४३ ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत ५ टक्के निधी

Next

विक्रमगड : अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना ५ टक्के थेट निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार विक्रमगड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या खात्यात हा निधी जमा झाला असून त्याचा वापर थेट विकासकामांसाठी होणार आहे.
हा ५ टक्के निधी खर्च करण्यासाठी ग्रामसभा व समिती असणार आहे. या निधीमुळे गावाचा, पाड्याचा कायापालट होणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी आर. के. गणरी यांनी दिली.
हा निधी ग्रामपंचायत निहाय व लोकसंख्येच्या आधारीत आला असून गावाचा विकास गावातच होणार आहे. ओंदे ग्रामपंचायत ११ लाख रू. बांधण ११ लाख, चिंचघर ११ लाख, दादडे १६ लाख, डोल्हारी खुर्द १६ लाख, मान ५५१८०४, विक्रमगड ११ लाख, सुकसाळे १६ लाख, आलोडा १६ लाख, उटावली २७ लाख, या एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजुर झाला असून त्यातील बराच निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झालेला आहे.
त्यामुळे या पैशातून गावाचा विकास होणार असला तरी तो योग्य पावती खर्च झाला पाहिजे व ताबडतोब आराखडा होण्याची गरज आहे. तरच या पैशाचा निनियोग होईल. या सर्व निधीकडे ग्रामसभेने आराखडा तयार करून विकासकामे करावी अशा सूचना आहेत.
(वार्ताहर)

Web Title: 43 panchayats have 5 percent funding under PESA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.