४३३६ अंगणवाडी सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:20 AM2018-11-07T04:20:50+5:302018-11-07T04:21:21+5:30

अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते.

 4336 Honor of Anganwadi Sevikas in Old Ways | ४३३६ अंगणवाडी सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने

४३३६ अंगणवाडी सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने

Next

ठाणे  - अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. परंतु, दिवाळीच्या मुहूर्तावर हा विषय गांभीर्याने घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ते जुन्या पद्धतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेंबरला जारी केले. यामुळे राज्यभरातील सेविकांना दिलासा मिळून त्यांची दिवाळी गोड झाली आहे.

राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडीसेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न केला नाही. यामुळे त्यांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. मात्र, ऐन दिवाळीत त्यांना मानधनापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची जाणीव होताच शासनाने हे आदेश जारी केले.

परंतु, यानंतरचे मानधन मात्र ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनादेखील जबाबदारीने संबंधित सेविकांकडून आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.‘पीएफएमबी’ प्रणालीत खातेजोडणी करण्यासाठी अंगणवाडीसेविका सहकार्य करत नसतील, तर संबंधित अधिकाºयांबरोबर अंगणवाडी सेविकांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्यात येईल.

Web Title:  4336 Honor of Anganwadi Sevikas in Old Ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई