ठाण्याच्या राेजगार मेळाव्यात ४४ कंपन्या बेराेजगारांसाठी ४१५२ रिक्त जागा घेऊन!
By सुरेश लोखंडे | Published: March 4, 2023 06:29 PM2023-03-04T18:29:13+5:302023-03-04T18:30:19+5:30
जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुशिक्षेित बेराेजगारांसाठी महारोजगार मेळावा घेतला.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुशिक्षेित बेराेजगारांसाठी महारोजगार मेळावा शनिवारी घेतला. त्यासाठी ४४ कंपन्यां उपस्थित राहून त्यांनी तब्बल चार हजार १५२ रिक्त जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा मार्फत हा स्व. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा पार पडला. यात अगदी पाचवी पास उमेदवारापासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या रिक्त जागी तब्बल ३९८ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. तर ४७ जणांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.
याप्रसंगी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार पाटील, सहायक आयुक्त संध्या साळुंखे, ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने, विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. र्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"