भिवंडीत गोवर रुबेला आजाराचे ४४ रुग्ण; नागरिकांनी सतर्क राहावे, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन 

By नितीन पंडित | Published: November 15, 2022 09:39 PM2022-11-15T21:39:25+5:302022-11-15T21:39:32+5:30

गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नसल्याचे मनपा सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.

44 patients of measles rubella disease in Bhiwandi; Citizens should be alert, commissioner appeals to citizens | भिवंडीत गोवर रुबेला आजाराचे ४४ रुग्ण; नागरिकांनी सतर्क राहावे, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन 

भिवंडीत गोवर रुबेला आजाराचे ४४ रुग्ण; नागरिकांनी सतर्क राहावे, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन 

googlenewsNext

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर रुबेला आजाराचे प्रमाण वाढले असून २७५ संशयित रुग्णांपैकी तपासणीत ४४ रुग्णांचे अहवाल रुबेला बाधीत आले असल्याची माहिती मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

रुग्ण बाधीत कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून संशयित रुग्णांना व्हिटामिन ए चा पहिला डोस व २४ तासानंतर दूसरा डोस देण्यात आला असून ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रुबेलाचा डोस घेतलेला नाही, अशा लाभार्थ्यांना गोवर रुबेला डोस दिला जात असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे. 

दरम्यान, गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नसल्याचे मनपा सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत असून गोवर रुबेला आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता गोवर रुबेला आजारावर नियंत्रण, उपाययोजना व विचार विनिमय करण्याकरीता खाजगी बालरोग तज्ज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग,अंगणवाडी पर्यवेक्षक, तसेच धर्मगुरु मौलाना यांच्या बैठका घेण्यात आल्या असून अशा प्रकारच्या आजाराची लक्षणे दिसतात. 

नागरिकांनी कोणतीही हलगर्जी न करता अथवा आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे अथवा मनपा आरोग्य विभागाकडे उपचार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन शेवटी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: 44 patients of measles rubella disease in Bhiwandi; Citizens should be alert, commissioner appeals to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.