ठाणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 4403; एक दिवसात आढळले ११० नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 08:00 PM2020-05-20T20:00:41+5:302020-05-20T20:01:17+5:30
ठामपात बुधवारी सापडले 110 नवे रुग्ण ; नवीमुंबईत सहा जण दगावले
ठाणे - जिल्ह्यात बुधवारी 234 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्ण संख्याही चार हजार 403 वर पोहोचली आहे. तर या आजाराने तब्बल नऊ जण दगावले असून मृतांची संख्या 138 इतकी झाली आहे. तर बुधवारी सर्वाधिक 110 रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मिळून आले आहेत. दिवसभरातील एकूण 234 रुग्णांपैकी 110 रुग्ण हे एकट्या ठामपामधील आहेत. तर अवघा एक रुग्ण हा अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तसेच दगावलेल्या नऊ पैकी 6 जण नवीमुंबई आणि 3 जण केडीएमसीमधील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठामपात 110 नवे रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण संख्या ही एक हजार 463 इतकी झाली आहे. त्याखालोखाल नवीमुंबईत 43 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या एक हजार 364 झाली आहे. तर नवीमुंबईत सहा जण दगावले असून येथील एकूण मृतांची संख्या 45 वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत नवे 26 रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 594 इतकी झाली आहे. तसेच केडीएमसीत तिघांचा मृत्यू ही झाला असून मृतांची संख्या ही 15 वर गेली आहे. 23 नवीन रुग्ण भिवंडीत मिळून आल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 77 झाली आहे. मिराभाईंदरमध्ये 14 नवे रुग्ण नोंदवल्याने एकूण रुग्ण संख्या 381 वर गेली आहे. उल्हासनगर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी 6 नवे रुग्ण मिळून आले असून तेथील एकूण रुग्ण अनुक्रमे 144 आणि 210 झाली आहे. बदलापुरात 5 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ही 124 झाली असून एक रुग्ण हा अंबरनाथ येथे मिळून आला आहे. त्यामुळे तेथील एकूण रुग्ण संख्या 47 इतकी झाली आहे. तर बुधवारी ठामपा,उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ,बदलापूर, मिराभाईंदर आणि ठाणे ग्रामीण या कार्यक्षेत्रात कोणीही दगावले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.