ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 340 बधीतांसह 45 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 08:25 PM2020-07-07T20:25:00+5:302020-07-07T20:25:14+5:30
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 381 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्युच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यात मंगळवारी जिल्ह्यात दिवसभरात नवीन 1 हजार 340 बाधित रुग्णांची तर, 45 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 45 हजार 266 तर, मृतांची संख्या 1 हजार 353 झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 381 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 880 तर, मृतांची संख्या 151 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 296 बाधितांची तर, 16 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 11 हजार 295 तर, मृतांची संख्या 432 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 115 रुग्णांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 72 तर, मृतांची संख्या 260 वर पोहोचला आहे.
मीरा भाईंदरमध्ये 162 रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 633 तर, मृतांची संख्या 172 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 30 बधीतांची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 437 वर पोहोचली. उल्हासनगर 119 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 88 तर,मृतांची संख्या 58 झाली आहे. अंबरनाथमध्ये 51 रुग्णांची तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 303 तर, मृतांची संख्या 78 झाली आहे.
बदलापूरमध्ये 62 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 73 तर, मृतांची संख्या 18 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 124 रुग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 485 तर, मृतांची संख्या 66 वर गेली आहे.