भिवंडीत ऑनलाईन कर्जाच्या बहाण्याने महिलेची ४५ हजारांची फसवणूक

By नितीन पंडित | Published: April 17, 2023 06:05 PM2023-04-17T18:05:45+5:302023-04-17T18:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शहरात ऑनलाईन एप्लिकेशन्स द्वारे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत महीले कडून ४५ हजार ५०० रुपये ...

45 thousand fraud of a woman on the pretext of online loan in Bhiwandi | भिवंडीत ऑनलाईन कर्जाच्या बहाण्याने महिलेची ४५ हजारांची फसवणूक

भिवंडीत ऑनलाईन कर्जाच्या बहाण्याने महिलेची ४५ हजारांची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : शहरात ऑनलाईन एप्लिकेशन्स द्वारे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत महीले कडून ४५ हजार ५०० रुपये उकळून तिचा फोटो व्हायरल करून बदनामी करणाऱ्या अज्ञाता विरोधात शहर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 समदनगर परिसरातील एका इमारती मध्ये राहणारी महिला नौसिन मजहर मुजाहिद वय २९  या महिलेच्या मोबाईल वर कॅन्डी कॅश या ॲप मधून कर्ज मंजूर झाल्याचे मेसेज आला त्यानंतर महिलेच्या बँक खात्यात २३ हजार २०० रुपये जमा झाले.त्या कर्जाच्या बदल्यात महिलेची फसवणूक करीत तिच्या जवळून ६८ हजार 7७०० रुपये उकळले.त्यामध्ये महिले कडून त्या कर्जाच्या बदल्यात फसवणुक करुन अज्ञातांनी ४५ हजार ५०० रुपये अधिक घेतले.

त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांका वरून फोन करून तुमचे पेमेंट अजून बाकी असून ते न भरल्यास तुमचा फोटो एडिट करून तुमच्या मोबाईल वरील सर्व नंबर वर पाठवून बदनामी करू अशी धमकी देखील विविध मोबाईल नंबर वरून अज्ञात इसमांनी दिली.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने तिने ज्या ज्या मोबलाई वरून धमकी आली त्याआधारे अज्ञात इसमा विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: 45 thousand fraud of a woman on the pretext of online loan in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.