ठाणे जिल्हा परिषदेच्या परीक्षेला शनिवारी पहिल्या दिवशी 457 परीक्षार्थी 

By सुरेश लोखंडे | Published: October 6, 2023 09:41 PM2023-10-06T21:41:58+5:302023-10-06T21:42:13+5:30

पवई आणि नवी मुंबईतील भारती विद्यापीठ या दोन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

457 examinees on the first day of the thane zilla parishad examination on saturday | ठाणे जिल्हा परिषदेच्या परीक्षेला शनिवारी पहिल्या दिवशी 457 परीक्षार्थी 

ठाणे जिल्हा परिषदेच्या परीक्षेला शनिवारी पहिल्या दिवशी 457 परीक्षार्थी 

googlenewsNext

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी उद्यापासून सरळ सेवा भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यात एकाच वेळी होत असलेल्या आँनलाईन लेखी परीक्षेला ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडलेले तब्बल 457 परीक्षार्थी शनिवारी लेखी परीक्षा देत आहेत. पवई आणि नवी मुंबईतील भारती विद्यापीठ या दोन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

ठाणे अंतर्गत गट - क सरळ सेवा भरतीसाठी ही लेखी परीक्षा सुरू आहे. शनिवार पासून या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीत विविध संवर्गातील एकूण 255  पदांची भरती होणार आहे. उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 7 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. या सरळ सेवा भरती परिक्षेच्या पहिल्या दिवशी रिगमन दोरखंडवाला व वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची परीक्षा घेण्यात येत आहे.8 ऑक्टोबर  रोजी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा एका दिवसात तीन सत्रात होणार आहे. यासठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना खास प्रशिक्षण दिलेले आहे.

Web Title: 457 examinees on the first day of the thane zilla parishad examination on saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा