कल्याण, ठाणे स्थानकातून श्रमिक ट्रेनने 4706 प्रवाशांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 10:31 PM2020-05-20T22:31:19+5:302020-05-20T22:32:12+5:30
कल्याण ते गोरखपूर आणि ठाणे ते दरभंगा, ठाणे लखनऊ मार्गावर ट्रेन
डोंबिवली: ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकलेले उत्तर प्रदेश मधील मजुरांसाठी मध्य रेल्वेने बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून गोरखपूरच्या दिशेने एक श्रमिक ट्रेन सोडली. तसेच ठाणे स्थानकातून लखनऊसाठी व बिहार (दरभंगा) श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. त्या तिन्ही ट्रेनमधून 4706 श्रमिकांनी प्रवास केला.
कल्याणमधीलमधीव ट्रेन।मधून 1506 तर ठाणे स्थानकातील दोन्ही ट्रेनमधून 3200 अशा एकूण 4706 श्रमिकांनी कुटुंबासह प्रवास केला. कल्याण स्थानकातील ट्रेन रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे बिहार ट्रेन संध्याकाळी 6।30 वाजता, तसेच ठाणे।लखनऊ ट्रेन रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास सुटली. त्यावेळी प्रवाशांना त्यांच्या घरी सुरक्षित जाण्यासाठी प्रशासनाने त्याना शुभेच्छा दिल्या. गाडी सुटण्या आधी सुमारे तीन तास अगोदर प्रवाशांना रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले होते. पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 तसेच अन्य भागातील ते श्रमिक होते.
दोन्ही स्थानकांमध्ये गाडीत प्रवेश करण्यापूर्वी त्या प्रवाशांचे मेडिकल चेकप करण्यात आले होते. त्यानंतर सोशल डिस्टन्स नियम।पाळून त्याना स्थानकात प्रवेश दिला, गाडी सुटण्याआधी त्या प्रवाशांना पाऊण तास आधी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवेश दिला. सगळे प्रवासी सुखरूप डब्यांमध्ये बसल्यानंतर त्याना शुभेच्छा देऊन गाडी सोडण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी रेल्वे पोलीस, लोहमार्ग} पोलीस, रेलवे अधिकरी तसेच अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.