ठाणे जिल्ह्यात ४७१ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:24 PM2021-02-19T21:24:03+5:302021-02-19T21:24:29+5:30

उल्हासनगरमध्ये न ऊ  रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही.

471 patients found in Thane district; Eight people died | ठाणे जिल्ह्यात ४७१ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात ४७१ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४७१ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५९ हजार ६६८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २२७ झाली आहे. ठाणे शहरात १४४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६० हजार ७४५  झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३७८ झाली. कल्याण - डोंबिवलीत १४५ रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू आहे. आता ६१ हजार ६८९ रुग्ण बाधीत असून एक हजार १८६ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये न ऊ  रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७२९ झाली. तर, ३७० मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७५० असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये १८ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ६६५ असून मृतांची संख्या ८०२ आहे. अंबरनाथमध्ये १० रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ६८१ असून मृत्यू ३१४ आहेत. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ६२५ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत १९ हजार ३९६ झाले असून  आतापर्यंत ५९२ मृत्यू नोंदले आहेत.

Web Title: 471 patients found in Thane district; Eight people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.