४८ गुन्ह्यांची उकल, भिवंडीतील घटना : २८ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:53 AM2017-10-14T02:53:13+5:302017-10-14T02:53:29+5:30

मागील काही महिन्यांपासून शहर आणि परिसरात घरफोडी,चेन स्नॅचिंग व दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एका महिन्यात ४८ गुन्हे उघडकीस आणून २८ आरोपींना अटक

48 Criminal cases, Bhiwandi incidents: 28 accused arrested | ४८ गुन्ह्यांची उकल, भिवंडीतील घटना : २८ आरोपींना अटक

४८ गुन्ह्यांची उकल, भिवंडीतील घटना : २८ आरोपींना अटक

Next

भिवंडी : मागील काही महिन्यांपासून शहर आणि परिसरात घरफोडी,चेन स्नॅचिंग व दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एका महिन्यात ४८ गुन्हे उघडकीस आणून २८ आरोपींना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींकडून ४७ लाख १० हजार ७८५ रूपयांचा ऐवज जप्त केला.
ठाणे, कल्याण व भिवंडीतून चोरी झालेल्या १६ दुचाकी जप्त केल्या असून या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. तर चेन स्नॅचिंग प्रकरणी चार इराणी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख दोन हजारांचे दागिने जप्त केले आहेत. कासारवडवली येथे घरफोडी करून सोनाराला विकलेले ९ लाख ४० हजाराचे ३३६ ग्रॅम सोने व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
नारपोली, निजामपूर व शहर पोलीस ठाण्यातील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले. चोरलेल्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री करणाºया टोळीस पकडून १० लाख १६ हजार ५०० रूपयांचे २२० मोबाइल जप्त केले.

Web Title: 48 Criminal cases, Bhiwandi incidents: 28 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.