वाहतूक पोलिसांनी उतरवली ४८ तळीरामांची झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:32+5:302021-03-30T04:24:32+5:30

ठाणे : होळी आणि धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४८ तळीरामांविरुद्ध तसेच ३१ सहप्रवाशांवरही ठाणे शहर वाहतूक ...

48 Taliram's Zing unloaded by traffic police | वाहतूक पोलिसांनी उतरवली ४८ तळीरामांची झिंग

वाहतूक पोलिसांनी उतरवली ४८ तळीरामांची झिंग

Next

ठाणे : होळी आणि धूलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४८ तळीरामांविरुद्ध तसेच ३१ सहप्रवाशांवरही ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली. त्याचबरोबर एक हजार १८२ विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणाऱ्यांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

बहुसंख्य रस्ते अपघात हे मद्यपी वाहनचालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्याच्या नावाखाली अनेक जण मद्य प्राशन करून वाहन चालवितात. याच पार्श्वभूमीवर मोटारवाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार मद्यपी वाहनचालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई केली जाते. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ विभागांतर्गत २८ मार्च रोजी रात्री आणि २९ मार्च रोजी दिवसभर विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात २८ मार्च रोजी दोन तर २९ मार्च रोजी ४६ अशा ४८ मद्यपी वाहनचालकांना पकडले. त्याच वेळी सोमवारी मद्यपींसमवेत वाहनांमध्ये असलेल्या ३१सह प्रवाशांवरही कारवाई झाली. यामध्ये अंबरनाथ विभागांतर्गत सर्वाधिक १३ मद्यपी वाहनचालकांसह १६ सहप्रवाशांवर कारवाई केली. रविवारी विनाहेल्मेट वाहन चालविणारे २७७ आणि सोमवारी ९०५ अशा एक हजार १८२ जणांवर कारवाई करण्यात आली. तर मोटरसायकलीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या ९८ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. विशेष म्हणजे या कारवाईसोबतच कर्कश आवाजात मोटरसायकल चालविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 48 Taliram's Zing unloaded by traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.