ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४८१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:46+5:302021-07-02T04:27:46+5:30
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ४८१ रुग्ण आढळले असून, गेल्या २४ तासात १० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच ...
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ४८१ रुग्ण आढळले असून, गेल्या २४ तासात १० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ३३ हजार ४७ बाधित तर १० हजार ७०९ मृतांची नोंद झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ९० रुग्णांची वाढ होऊन दोघांचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख ३३ हजार ४१५ रुग्णांची व दोन हजार १२ मृतांची नोंद झाली. कल्याण-डोंबिवलीत ८५ रुग्ण सापडले असून, एकाचा मृत्यू झाला. आता येथील एकूण एक लाख ३६ हजार ४३५ बाधितांसह दोन हजार ५९३ मृतांची नोंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये सहा रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला. या शहरात आता एकूण २० हजार ७९३ रुग्णांसह ५०६ मृत्यू नोंदले गेले आहेत. भिवंडीत सहा रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही. येथील रुग्णांची संख्या १० हजार ६१६ व ४५९ मृत्यू आजपर्यंत झाले आहेत. मीरा- भाईंदरला दिवसभरात ६३ बाधितांसह दोन मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आतापर्यंत ५० हजार ७०० बाधित व एक हजार ३३८ मृतांची नोंद झाली.
अंबरनाथला १९ बाधित सापडले असून, एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्णसंख्या १९ हजार ७४५ झाली असून, मृत्यूसंख्या ५१६ वर गेली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत २५ रुग्णांची वाढ होऊन, एकही मृत्यू नाही. या शहरातील २१ हजार १०२ बाधितांची व ३४७ मृतांची नोंद आतापर्यंत झाली. ग्रामीण गावपाड्यात ४३ रुग्ण आढळले असून, एक मृत्यू आहे. या परिसरातील बाधितांची संख्या ३९ हजार ३६३ झाली असून, मृत्यू एक हजार १८४ नोंदले गेले आहेत.