नागरिकांसाठी उपयुक्त ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्ह्यात आधीच रिक्त ; पुन्हा १२३ केंद्रांसाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:13 PM2018-04-10T19:13:16+5:302018-04-10T19:13:16+5:30
सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीदेखील जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत.
ठाणे : विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीदेखील जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत. या केंद्रांसाठी सेवा पुरवणाऱ्या इच्छुकांकउून २३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंदाव्दारे सेवा देणा-या संस्थांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नावे मागिवली आहेत. ँ३३स्र://३ँंल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन संबंधीतांनी ठिकठिकाणी सुरू करण्यात येणा-या केंद्रांची यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ती कार्यरत नाहीत अशा १२३ केंद्रांच्या ठिकाणाीची माहिती इच्छुकांना प्राप्त होणार आहे.
सध्या जिल्ह्यात ५४९ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. यात शहापूर तालुक्यात २६ ठिकाणी ती नव्याने सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय मुरबाड ५९, कल्याण १७, भिवंडी परिसरात २१ आदी १२३ केंद्रांसाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधीतांकडून मागविले आहेत. याशिवाय सध्या ठाणे मनपा क्षेत्रात १४३, मीरा भार्इंदर ७१, नवी मुंबई ७८, कल्याण डोंबिवली ९४, भिवंडी निजामपूर ५२, उल्हासनगर दहा तर अंबरनाथ नगरपरिषद २०, बदलापूर नगरपरिषदेसह, मुरबाड ला एक आणि शहापूर तालुक्यात सहा ठिकाणी ही केंद्रे रिक्त आहेत. जिल्ह्यातील या रिक्त आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून पाहणा-याइच्छुकांनी आपापल्या प्रांत किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुना अर्ज आणि प्रतिज्ञापत्र भरून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.