आरोग्यमंत्र्यांच्या कळव्यात 5 डॉक्टरांना डेंग्यू, रेडिओलॉजी विभाग बंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 07:38 PM2019-08-27T19:38:24+5:302019-08-27T20:17:56+5:30
कळवा हॉस्पिटल ज्या लोकसभा मतदार संघात येते, त्या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर आहेत.
विशाल हळदे / अजित मांडके
ठाणे - कळव्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरच डेंग्यूने आजारी पडले आहेत. त्यामुळे कळवा हॉस्पिटल आणि ठाणे महानगरपालिकेवर चहूबाजूने टिका होते आहे. हा मुद्दा आता चांगला तापला असून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. हाच मुद्दा घेत ठाणे काँग्रेसनं कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना घेराव घालत प्रशासनाचा निषेध केला आहे.
कळवा हॉस्पिटल ज्या लोकसभा मतदार संघात येते, त्या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर आहेत. ज्या जिल्हयात हे हॉस्पिटल येतं, त्या जिल्ह्यातील आमदार आरोग्यमंत्री आहेत, असं असतानाही डॉक्टरच आजारी पडत आहेत. यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती ? अशी बोचरी टिकाही काँग्रेसने आरोग्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. कळवा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दरदिवशी शेकडो गरजू रुग्ण येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून येथे डॉक्टरांची कमतरता भासत असून डेंग्यूचे डास यास कारणीभूत आहेत. येथील रेडिओलॉजी विभागात दोन वरिष्ठ डॉक्टर आणि सहा शिकाऊ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. या विभागात गरोदर स्त्रियांचं प्रमाणही मोठं आहे. या विभागाची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांवरच असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या विभागातील पाच डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आल आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या गैरहजेरीत हा विभाग तात्पुरता बंद करावा लागेल, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये.