सूर्याचे ५ दरवाजे उघडले, मोडकसागर ओव्हरफ्लो

By Admin | Published: July 16, 2017 02:20 AM2017-07-16T02:20:08+5:302017-07-16T02:20:08+5:30

मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

5 doors of sun opening, Modakasagar overflow | सूर्याचे ५ दरवाजे उघडले, मोडकसागर ओव्हरफ्लो

सूर्याचे ५ दरवाजे उघडले, मोडकसागर ओव्हरफ्लो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/कासा : मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाखालील वाडा व पालघर तालुक्यातील ४२ गावांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. तर बुधवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी साडेसहानंतर सुर्या धरणाचेही सर्व पाच दरवाजे उघडले आहेत.
शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालीत पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवस पावसाने दडी मारली असताना ठाणे, पालघर आणि मुंबईसह राज्यावर पाण्याचे संकट ओढवले होते. मात्र, बुधवारी रात्रीपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील धरणे झपाट्याने भरू लागली आहेत. यापैकी शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळील मोडकसागर या धरणाच्या पातळीत या पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांतच या धरणामधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पुढील २४ तास पाऊस असाच बरसत राहिला, तर धरणामधील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. हा परिसरातील गावांना धोक्याचा इशारा ठरू शकतो. याकरिता, येथील सहायक जलअभियंत्यांनी या धरणाच्या टप्प्याखाली येणाऱ्या ४२ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. या यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त, आपत्कालीन विभाग, भिवंडी, शहापूर, वाडा, पालघरचे तहसीलदार आदींचा समावेश आहे. तर, या धरण आणि नद्यांच्या टप्प्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गावांमध्ये दाधारे, जोशीपाडा, शेले, तिलसे पिंप्रोली, धीनदेपाडा, गाले, अनशेत, तुरी, सारसी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स बुद्रुक, शील, गेट्स खुर्द, अब्जे, आलमान, कुतल, बोरांदे, आवंधे, नाने, गलतरे, हमरापूर, सावरे, पाचूधारा, इंबुर, खडकीपाडा, मनोर, उधारापाडा, बहलोली, बोट, दहिसर मनोर, देवानीपाडा, खामलोली, विश्रामपूर, साखरे, ललटने, उंचवली, कोरीचापाडा, कोनपाडा आणि नवघर या गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे वाडा आणि पालघर तालुक्यांतील आहेत. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी ५३५.२६ फूट टीएचडीएवढी आहे. त्यामुळे हे धरण केव्हाही पूर्ण भरून वाहू शकते. त्यामुळे या गावांना हा इशारा देण्यात आला आहे.

४२३७ क्यूसेक्स विसर्ग
कासा : दोन दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सूर्या धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून ४ हजार २३७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातल्या शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण (धामणी) सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे ७६ टक्के भरले असून पाणी नियंत्रणासाठी शनिवारी संध्याकाळपासून धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पेठ, म्हसाड येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणची वाहतूकही खोळंबून राहिली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दुर्घटनेचे वृत्त हाती आलेले नव्हते.

Web Title: 5 doors of sun opening, Modakasagar overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.