कसारा घाटात दूध टँकर दरीत कोसळून 5 ठार, 4 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 07:21 PM2024-08-18T19:21:22+5:302024-08-18T19:21:40+5:30

चालकाचे बल्कर पॉईंटजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळला.

5 killed, 4 injured after milk tanker fell into valley in Kasara ghat | कसारा घाटात दूध टँकर दरीत कोसळून 5 ठार, 4 जखमी

कसारा घाटात दूध टँकर दरीत कोसळून 5 ठार, 4 जखमी

कसारा- सिन्नरहून मुंबईकडे दूध घेऊन निघालेले दूध टँकर नाशिक मुंबई लेनवरील कसारा घाटात खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात 5 जन मयत झाले तर 4 जन गभीर जखमी झाले आहेत. घाट उतरत असताना चालकाचे बल्कर पॉईंटजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळला.

दूध टँकरमध्ये बसलेले 9 पैकी 4 जण गंभीर जखमी झाले, तर 5 जन जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धावं घेतली व मदत कार्य सुरु केले. आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, देवा वाघ, जास्विंदर सिंग, नाना बोऱ्हाडे, बाळू मांगे, पप्पू सदगीर, कैलास गतिर यांनी टोल कंपनी पेट्रोलिंगचे कर्मचारी सुरज आव्हाड, सचिन भडांगे, समीर चौधरी, शिवा कातोरे, देविदास म्हसणे, संदिप म्हसणे, हिरामण पराड, राजेंद्र मोरे ,विठोबा भागडे यांचे मदतीने 5 मृतदेह व 4 जखमींना बाहेर काढले.

जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून व 1033 टोल रुग्णवाहिकेतून कसारा व इगतपुरी सरकारी रुग्णालयात् पाठवण्यात आले, तर मृत व्यक्तींना खासगी रुग्णवाहिकेतून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

या अपघातात जखमींपैकी १)अक्षय विजय घुगे, वय तीस वर्षे राहणार निमोन तालुका संगमनेर २)श्लोक जायभाय, वय पाच वर्ष राहणार नालासोपारा ३) अनिकेत वाघ, वय 21 वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर ४) मंगेश वाघ, वय पन्नास वर्षे राहणार निहळ तालुका सिन्नर हे जखमी असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे आणण्यात आले आहे. तर मृतांमध्ये १) विजय घुगे, वय साठ वर्ष राहणार निमोण तालुका संगमनेर २) आरती जायभाय, वय 31 वर्ष राहणार नालासोपारा ३) सार्थक वाघ वय, 20 वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर ४) रामदास दराडे, वय पन्नास वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर व चालक 5) योगेश आढाव, राहणार राहुरी या पाच व्यक्ती मयत झाले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे,तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्ग चे डी वाय,एस्.पी.प्रदीप मैराळ, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, महामार्ग चे पोलीस अधिकारी यांनी धाव घेऊन परिस्थिती ची पहाणी केली.

Web Title: 5 killed, 4 injured after milk tanker fell into valley in Kasara ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.