'गोविंदा' प्रथमेश सावंतला CM एकनाथ शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:08 PM2022-09-27T19:08:16+5:302022-09-27T19:40:59+5:30

करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला होता.

5 lakhs help from CM Eknath Shinde to Prathamesh Sawant; He was injured in Dahihandi | 'गोविंदा' प्रथमेश सावंतला CM एकनाथ शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी

'गोविंदा' प्रथमेश सावंतला CM एकनाथ शिंदेंकडून ५ लाखांची मदत; दहीहंडीवेळी झाला होता गंभीर जखमी

Next

ठाणे: दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाला आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीकरित्या पाच लाखांची मदत केली आहे. ही मदत शिवसेना प्रवक्ते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रथमेश सावंत याला सुपुर्द केली. आणि शिवसेना त्याच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.

करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्याने जखमी झाला असून मणक्याच्या पॅरेलिसीसला सामोरे जावे लागले. प्रथमेश सावंत हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रथमेश सावंत याचे आईवडील नसून त्याचा सांभाळ नातेवाईक करीत आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्त‍िकरित्या त्याला पाच लाखांची मदत केली आहे.

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज के.ई.एम. रुग्णालयात प्रथमेश सावंत याची भेट घेवून त्याची विचारपूस केली व पाच लाखांची मदत सुपुर्द केली. सरकार त्याच्या पाठीशी आहेच, परंतु शिवसेना सदैव त्याच्या सोबत असल्याची ग्वाही त्याला नरेश म्हस्के यांनी दिली.  यावेळी प्रथमेश सावंत याचे नातेवाईक, के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठाता, रुग्णालय प्रशासन व साईभक्त क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व टेंभीनाका उपविभागप्रमुख स्वानंद पवार, शाखाप्रमुख नितीन बुडजडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत प्रथमेश सावंत याच्या तब्बेतीकडे लक्ष ठेवून असल्याबाबत व त्याला वैयक्त‍िकरित्या पाच लाखांची मदत केल्याबद्दल प्रथमेशचे नातेवाईक व साईभक्त क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकांने त्यांचे आभार व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंनी नुकताच फोन करून दिला होता आधार-

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वीच प्रथमेशच्या तब्येतीची विचारपूस केली. याबाबत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी रुग्णालयात भेट घेत माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रथमेशवर उपचार करण्यासाठी येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली होती.

Web Title: 5 lakhs help from CM Eknath Shinde to Prathamesh Sawant; He was injured in Dahihandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.