मीरा भाईंदर मधील वैद्यकीय क्षेत्रातील ५ हजार ८३६ जणांचे होणार पहिल्या टप्प्यात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 06:00 PM2020-12-25T18:00:06+5:302020-12-25T18:00:15+5:30

 केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका हद्दीत कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्याची तयारी आहे.

5 thousand 836 people in the medical field in Mira Bhayander will be vaccinated in the first phase | मीरा भाईंदर मधील वैद्यकीय क्षेत्रातील ५ हजार ८३६ जणांचे होणार पहिल्या टप्प्यात लसीकरण

मीरा भाईंदर मधील वैद्यकीय क्षेत्रातील ५ हजार ८३६ जणांचे होणार पहिल्या टप्प्यात लसीकरण

Next

मीरारोड - कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागा अंतर्गत २१ आरोग्य संस्थां मधील १६८८ तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील ६७१ संस्थां मधील ४१४८ असे मिळून एकूण ५ हजार ८३६ वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे . 

 

 केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका हद्दीत कोविड लसीकरणाचा पहिला टप्पा

राबविण्याची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत महापालिकेसह खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, आशा  स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह अन्य कोविड योद्ध्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

 

पहिल्या टप्प्यातील ५ हजार ८३६ वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची संगणीकृत नोंदणी शासन निर्देशित कोविन ऍ़पमध्ये करण्यात आली आहे. लसीकरणास सुरूवात झाल्यानंतर नोंदणीकृत व्यक्तींच्या मोबाईलवर

लसीकरण दिवस आणि स्थळ याचा संदेश प्राप्त होणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये १ व्हॅक्सीनेटर ऑफीसर व ४ व्हॅक्सीनेशन ऑफीसर यांचा समावेश राहील. एका पथकामार्फत १०० व्यक्तींना लस दिली जाईल. 

 

या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी यांचे तर आरोग्य केंद्र स्तरावर परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, टीबीएचव्ही, आशा स्वयंसेविका,  अंगणवाडी सेविका इ. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे . 

 

 कोरोना लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा व नियोजनासाठी आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या

अध्यक्षतेखाली विशेष बैठक – सिटी टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. जळगावकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलिस उपआयुक्त वि.एम.सागर, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ, लसीकरण अधिकारी डॉ. अंजली पाटील, विविध क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी , संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते . डॉ. जळगावकर यांनी कोविड लसीकरणाची कार्यपध्दती व रुपरेषा कशाप्रकारे राहील याची माहिती दिली.   

 

 या बैठकीत सर्व संस्थानी आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ, लसीकरणासाठी जागा, खाजगी वैद्यकीय

व्यावसायिकांचा सहभाग इ. पूरक बाबी महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.     लसीकरण झाल्यानंतरही वारंवार हातधुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे.

Web Title: 5 thousand 836 people in the medical field in Mira Bhayander will be vaccinated in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.