ठाणे परिवहनच्या बसमध्ये जेष्ठ नागरीकांना मिळणार आता ५० टक्के सवलत, महासभेत प्रस्ताव मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 03:43 PM2018-12-28T15:43:31+5:302018-12-28T15:45:53+5:30

जेष्ठ नागरीकांना परिवहनच्या बसेसमध्ये मिळणारी २० टक्यांची सवलत आता ५० टक्के करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ ५ हजार २७६ जेष्ठ नागरीकांना होणार आहे.

50% concession for senior citizens to get in Thane transport bus, proposal approved in Mahasabha | ठाणे परिवहनच्या बसमध्ये जेष्ठ नागरीकांना मिळणार आता ५० टक्के सवलत, महासभेत प्रस्ताव मंजुर

ठाणे परिवहनच्या बसमध्ये जेष्ठ नागरीकांना मिळणार आता ५० टक्के सवलत, महासभेत प्रस्ताव मंजुर

ठळक मुद्दे५ हजारे २७६ जेष्ठ नागरीकांना मिळणार लाभवार्षिक ५ कोटी १० लाखांचा पडणार बोजा

ठाणे - ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरीकांना आता बस भाड्यात ५० टक्के सवलत मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. परंतु या सवलतीमुळे परिवहनवर पाच कोटी १० लाखांचा बोजा पडणार आहे.
                  ठाणे महापालिका क्षेत्रातील जेष्ठ नागरीकांना यापूर्वी मासिक भाड्यात २० टक्के सवलत दिली जात होती. ही योजना २००६ पासून लागू करण्यात आलेली आहे. मात्र, या योजनेचा जेष्ठ नागरीक लाभ घेत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य परिवहन सेवेच्या बस भाड्यात ६५ वर्षावरील नागरिकांना ५० टक्के, नवी मुंबई परिवहन उपक्र मामध्ये ६५ वर्षावरील नागरिकांना ७५ टक्के सवलत दिली जाते. तर बेस्ट उपक्र मात मासिक भाड्यात ५० रु पये तर त्रैमासिक भाड्यात २०० रु पये इतकी सवलत दिली जाते. राज्य परिवहन आणि नवी मुंबई परिवहन उपक्र मातील सवलती पहाता त्या तुलनेत टिएमटीची सवलत फारच कमी आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर परिवहन उपक्र माने जेष्ठांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास वर्षभरापूर्वी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. ठाणे तहसील कार्यालयाकडून शहरातील ६५ वर्षावरील नागरिकांना ओळखपत्र वितरीत करण्यात येते. २०१६-१७ या वर्षामध्ये तहसील कार्यालयामधून ५ हजार दोनशे ७६ जणांना जेष्ठ नागरिकांची ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
                     त्यानुसार या जेष्ठांना परिवहनच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्मय घेण्यात आला असल्याने परिवहनवर वार्षीक ५ कोटी १० लाख ३२ हजार ११० रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. या तुटीची रक्कम महापालिका परिवहन उपक्र माला अनुदान स्वरु पात देणार आहेत.


 

Web Title: 50% concession for senior citizens to get in Thane transport bus, proposal approved in Mahasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.