शहापूर तलाठ्याच्या कुटुंबीयांना कोविडविम्याचे 50 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:40 PM2020-12-16T23:40:26+5:302020-12-16T23:40:35+5:30

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ती यांच्या पत्नी आरती यशवंतराव आणि मुले आर्या व आराध्य यांना ५० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्द केला.

50 lakh of KovidVima to the families of Shahapur Talatha | शहापूर तलाठ्याच्या कुटुंबीयांना कोविडविम्याचे 50 लाख

शहापूर तलाठ्याच्या कुटुंबीयांना कोविडविम्याचे 50 लाख

Next

ठाणे : शहापूरचे तलाठी नितीन यशवंतराव यांचे कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन निधन झाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेले पन्नास लाखांच्या विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना मंजूर झाली आहे. यानुसार, बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ती यांच्या पत्नी आरती यशवंतराव आणि मुले आर्या व आराध्य यांना ५० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्द केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दौलत दरोडा ऑनलाइन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कोविडचे विमा कवच मिळणारे राज्याच्या महूसल विभागातील हे पहिलेच प्रकरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वाहनचालक आत्माराम अलीमकर (सेवा वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय) यांना सदर मदत मंजूर झाल्याचा शासन आदेश निर्गमित झाला आहे, तर शिपाई गोपाळ आगीवले यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर केलेला आहे.
नितिन गुलाबराव यशवंतराव (४१) हे तलाठी सजा शहापूर या सजेवर २०१८ पासून कार्यरत होते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रथम कोविड केअर सेंटरचे शहापूरमधील शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटी आसनगाव येथे उभे करण्याकामी तालुक्यातील मुख्यालय सजेचे तलाठी या नात्याने त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. 
तदनंतर शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटी आसनगाव, ता.शहापूर येथे कोविड केअर सेंटरमधील सर्व सुविधांचा समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. हे कर्तव्य पार पाडीत असताना, त्यांना दुर्दैवाने कोरोनाची लागण होऊन त्यांचे ११ ऑगस्टला निधन झाले. एरवी नागरिकांना सरकारी कामाचा वाईट अनुभव येताे. मात्र,  या घटनेतून सरकार आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल गंभीर असल्याचे दिसून येते.

शासन खंबीरपणे उभे
कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये मोठ्या प्रमाणावर जोखीम पत्करून शासकीय यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्यापश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Web Title: 50 lakh of KovidVima to the families of Shahapur Talatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.