मालमत्ताकरात ५० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:05 AM2018-02-22T00:05:34+5:302018-02-22T00:05:36+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने मंगळवारी झालेल्या विशेष महासभेत मालमत्ता करात ५० टक्के दरवाढीला भाजपाने मान्यता दिली.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने मंगळवारी झालेल्या विशेष महासभेत मालमत्ता करात ५० टक्के दरवाढीला भाजपाने मान्यता दिली. याविरोधात शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात थाळीनाद केला. विरोधकांनी काळा पोषाख परिधान करुन करवाढीच्या निषेधाचे बॅनर गळ््यात अडकवले होते.
भुयारी गटार योजनेसाठी २२६ कोटी ६५ लाख रुपये, रस्ते बांधणीसाठी २३ कोटी ३५ लाख रुपये, जलवाहिनीसाठी ५६ कोटी १६ लाख रुपये, ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेसाठी २८ कोटी ५५ लाख रुपये कर्ज पालिकेने एमएमआरडीएकडून घेतले आहे. तर काँक्रिटचे रस्ते बांधण्यासाठी १०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठवला आहे. या कर्जाच्या परतफेडीसाठी पालिकेला वर्षाकाठी सुमारे ४० कोटी हप्त्यापोटी द्यावे लागतात. त्यामुळे २१ आॅगस्ट २०१६ च्या महासभेने निवासी मालमत्ता कराचे दर ५ पैसे ते १ रुपये ६० रुपये तर व्यावसायिक मालमत्ता कराचे दर ८० पैसे ३ रुपये प्रती चौरस फुटामागे निश्चित केले होते. यात चार वर्षांनी ५ टक्के दरवाढ करण्याचे ठरवले होते. परंतु, त्यात अद्याप कोणतीही वाढ झाली नसल्याने पालिकेचे उत्पन्न मर्यादित राहिले. त्यात वाढ करण्यासाठी भाजपाच्या गीता जैन यांनी ५० टक्के मालमत्ता करवाढीचा ठराव मांडला. मात्र या दरवाढीतून काजूपाडा, चेणे, वर्सोवा, काशी, माशाचा पाडा, मीरागाव, महाजनवाडी, घोडबंदर गाव, आदिवासी पाड्यांना वगळून त्यांना पूर्वीचा ५ पैसे प्रती चौरसफुटाचा दर कायम ठेवला. तसेच वाढीव दराची आकारणी १ एप्रिलपासून होणाºया बांधकामांना लागू होणार आहे. जुन्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने कर आकारणीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करावे लागणार असल्याचे जैन यांनी नमूद केले.