मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही; ठाण्यातून ३८ तर कल्याणमधून १२ बस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:11 AM2020-10-17T00:11:58+5:302020-10-17T07:37:09+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता.

50 Shivshahis for Mantralaya, Swargate, Kolhapur, Alibag; 38 buses from Thane and 12 from Kalyan | मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही; ठाण्यातून ३८ तर कल्याणमधून १२ बस 

मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही; ठाण्यातून ३८ तर कल्याणमधून १२ बस 

googlenewsNext

ठाणे : शासनाने एसटी वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर आता शिवशाहीदेखील रस्त्यावर धावणार आहेत. त्यानुसार ठाणे, बोरिवली, कल्याण येथून बोरिवली, मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर आणि अलिबाग या मार्गांवर वातानुकूलित शिवशाहीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे-१ आगारातून २२, ठाणे-२ आगारातून १६, तर कल्याण आगारातून १२ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता. त्याचा परिणाम खासगी व शासकीय क्षेत्रातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटकादेखील बसला आहे. त्यात एसटी महामंडळालादेखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असून कामगारांचे वेतनदेखील थकीत राहिले होते. त्यात टाळेबंदीत शिथिलता आणून आर्थिकचक्र गतिमान करण्यासाठी विविध व्यवसायांना व वाहतुकीला शासनाने परवानगी दिली. यात आता वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून उपरोक्त मार्गांवर शिवशाही धावणार आहे.
 

Web Title: 50 Shivshahis for Mantralaya, Swargate, Kolhapur, Alibag; 38 buses from Thane and 12 from Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.