ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान
By सुरेश लोखंडे | Published: May 20, 2024 08:41 PM2024-05-20T20:41:05+5:302024-05-20T20:50:38+5:30
या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभा मतदारसंघातील २४ उमेदवारांप्रमाणेच कल्याण मतदारसंघाताील २८ आणि भिवंडी लाेकसभेचे २७ उमेदवार आदी मिळून जिल्ह्यातील या ७९ उमेदवारांना सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवरील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले आहे. मात्र शेवटच्या एका तासाचे मतदान येण्यास विलंब हाेणार असल्यामुळे जिल्ह्याभरात संध्याकाळपर्यंत ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले.
जिल्ह्यात आज पाचव्या टप्यात मतदान झालं आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१९ ला ५०.२१ टक्के मतदान जिल्ह्याभरात झाले हाेते. त्यात यावेळी वाढ हाेऊन ते ५५ टक्केपर्यंत जाण्याचा आंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.जिल्ह्यातील या तिन्ही लाेकसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्राव्दारे ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. यंत्र बंद पडण्याच्या किरकाेळ घटना वगळता जिल्ह्यातील या तिन्ही मतदारसंघात आज शांततेत मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र उन्हाची दाहकता वाढल्यामुळे मतदारांचा उत्साह कमी झालेला दिसून आला. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंतच्या दाेन फेऱ्यांमध्ये ठाणे लाेकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभांमध्ये १४.८६ टक्के मतदान झाल्याची नाेंद आहे. तर कल्याणमध्ये १४.१२ टक्के आणि भिवंडी मतदारसंघात १४.७९ टक्के मतदान पहिल्या चार तासात झाल्याची नाेंद आहे.
जिल्ह्यात १ वाजेपर्यंत २५.३५ टक्के मतदान झाले हाेतेत्र त्यापैकी ठाणे मतदारसंघात २६.०५ टक्के म्हणजे सहा लाख ५३ हजार ३५२ मतदान झाले. कल्याणमध्ये २२.५२ टक्के म्हणजे चार लाख ६९ हजार ४६ जणांनी मतदान केले. भिवंडीत २७.३४ टक्के म्हणजे पाच लाख ७० हजार ७५० जणांनी मतदान केल्याचे उघड झाले आहे. याप्रमाणेच ३ वाजेपर्यंत या मतदारसंघात सात लाख ७३ हजार ६६६ जणांनी मतदान केंले असता ३७.०६ टक्के या मतदानाची नाेंद झाली. तर ठाण्यात ३६.०७ टक्के म्हणजे नऊ लाख चार हजार ६६१ मतदांनी मतदान केल्याचे उघड झाले. तर कल्याणमध्ये सहा लाख ७५ हजार ४५२ म्हणजे ३२.४३ टक्के मतदान ३ वाजेपर्यंत झाल्याची नाेंद करण्यात आलेली आहे. या मतदानात कल्याणमध्ये ५ वाजेपर्यंत सुमारे १० टक्के वाढ हाेऊन ती ४१.७० टक्के म्हणजे आठ लाख ६८ हजार ५२७ जणांनी मतदान केल्याचे उघड हाेत आहे. याप्रमाणेच ठाण्यामध्ये १० टक्के वाढ हाेऊन ४६.७७ टक्के म्हणजे ११ लाख ७३ हजार २५ मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. तर भिवंडीत सर्वाधिक १३ टक्के वाढ हाेऊन ५ वाजेपर्यंत ४९.४३ टक्के म्हणजे दहा लाख ३१ हजार ९०२ जणांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून येत आहे.