हजार सदनिकांच्या मोबदल्यात पोलिसांना मिळणार ५०० घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:40 AM2018-12-05T01:40:08+5:302018-12-05T01:40:18+5:30

मागील कित्येक वर्षे आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असलेल्या वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

500 houses to get copies of thousands of plots | हजार सदनिकांच्या मोबदल्यात पोलिसांना मिळणार ५०० घरे

हजार सदनिकांच्या मोबदल्यात पोलिसांना मिळणार ५०० घरे

Next

ठाणे : मागील कित्येक वर्षे आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असलेल्या वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. म्हाडाने या पोलीस वसाहतीचा पुनर्विकासाचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यानुसार ५६० सदनिका विनामोबदला बांधून देण्याची हमी दिली आहे. तसेच १ हजार अतिरिक्त सदनिका बांधण्यात येणार असून त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही दिले आहे. थोडक्यात या संपूर्ण सदनिका बांधण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधांसह सेवा शुल्कासह सुमारे १०० कोटी रुपयांच्या खर्चाच्या बदल्यात म्हाडा १००० हजार सदनिका स्वत: घेणार असून त्याबदल्यात पोलिसांना अवघ्या ५०० सदनिका देणार आहे.
मागील कित्येक वर्षांपासून वर्तकनगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचे घोडे अडले होते.
या इमारतींचा पुनर्विकास व्हावा, पोलिसांना घरे मिळावित यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी वारंवार विधानसभेत आवाज उठविला आहे. तसेच राज्य शासनाकडे वारंवार पत्रव्यवहारही केला आहे. त्यानंतर आता खºया अर्थाने या वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.
या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासंदर्भात मागील महिन्यात ५ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर आता या संदर्भातील प्रस्ताव म्हाडाने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तांपुढे ठेवला आहे.
>म्हाडाला ४०० ते ४५० कोटींचा फायदा
पोलिसांना करावा लागणारा हा खर्च वाचविण्यासाठी म्हाडाने दुसरा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार हा जो काही खर्च हा तो काहीच द्यावा लागणार नसून ५६० सदनिका या मोफत उपलब्ध करून दिल्या जातील असे स्पष्ट केले आहे. परंतु त्या बदल्यात म्हाडा या जागेतील ४०,००० चौरस मीटर क्षेत्रावर सुमारे १ हजार सदनिका उभारणार आहे. त्या म्हाडाच्या धोरणानुसार (पुनर्विकासाचा सर्व खर्च विचारात घेऊन) बाजारात विकणार आहे. त्यातही ती करतांना यामध्ये पोलीस कर्मचाºयांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असेही म्हाडाने या प्रस्तावात नमूद केले आहे. तर उर्वरीत सदनिका बाजारात प्रचलित धोरणाप्रमाणे विक्री केल्या जातील. म्हणजेच १०० कोटींच्या खर्चात बदल्यात म्हाडा हजार सदनिका विकून ४०० ते ४५० कोटी रुपये कमविणार आहे.या सदनिकांशिवाय या ठिकाणी पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयसुद्धा म्हाडा मार्फत मोफत बांधून देण्यात येणार आहे. आता पोलीस विभागाकडून यावर काय धोरण अवलंबिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असले तरी म्हाडाचा हा प्रस्ताव पोलीस विभाग मान्य करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच पोलीस वसाहतीचा मार्ग आता येत्या काळात मोकळा होणार आहे.
>पोलिसांनी घरे बांधल्यास १०० कोटींचा खर्च
पोलिसांनी हे काम केल्यास त्यांना बांधकाम खर्चाव्यतिरिक्त पोलीस विभागाकडील सेवाशुल्काची थकबाकी साधारणपणे ५ कोटी आणि त्यावरील व्याज, ठाणे महापालिकेकडे पायाभूत सुविधांकरीता भरावयाचे शुल्क ७.५ कोटी, उपलब्ध होणाºया चटईक्षेत्रासाठी (५११४४.५२ चौरस मीटर) बांधकाम क्षेत्रासाठी म्हाडाकडे भरावे लागणारे अधिमुल्य ७५.८९ कोटी असा सुमारे १०० कोटींपेक्षा जास्तीचा खर्च आणि बांधकाम खर्च हा पोलिसांना करावा लागणार आहे.
>असे मिळणार चटईक्षेत्र
यानुसार यामध्ये येथील इमारत क्रमांक १४,१५ आणि १४ या इमारतींच्या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ ४४.०५ चौ.मीटर एवढे असून येथे ४० सदनिका आहेत. तर त्याचे एकूण क्षेत्रफळ हे १७६२ एवढे आहे.
इमारत क्रमांक ५१,५२ आणि ५३ येथील सदनिकांचे क्षेत्रफळ ३३.८१ एवढे असून येथे १२० सदनिका असून त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ४०६६.८ एवढे आहे.
इमारत क्रमांक ५७,५८,५९,६०,६१ मधील सदनिकांचे चटई क्षेत्रफळ १४.५५ चौ.मीटर एवढे असून एकूण क्षेत्रफळ हे ११४६८.८ एवढे आहे. त्याअनुषगांने म्हाडा या इमारतींचा सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे.
यात पुनर्विकासासाठी उपलब्ध होणारे भूखंडाचे क्षेत्र हे १२००२.४२ चौरस मीटर एवढे असून अनुज्ञेय चटई निर्देशांक २.५ प्रमाणे हे क्षेत्रफळ ३०००६.०५ चौरस मीटर एवढे उपलब्ध होणार आहे.
याशिवाय अनुज्ञेय चटई क्षेत्राशिवाय प्रोराटा अनुज्ञेय क्षेत्र हे ६३१६६.९४ चौरस मीटर असणार असून उपलब्ध होणारा चटईक्षेत्र निर्देशांक ५.२६ एवढा असणार आहे.

Web Title: 500 houses to get copies of thousands of plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.