महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून एक हजार प्रवाशांची सुटका, मदतकार्य युद्धपातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 01:20 PM2019-07-27T13:20:03+5:302019-07-27T13:50:07+5:30
बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
बदलापूर - बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून, आतापर्यंत एक हजार प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
National Disaster Response Force (NDRF) on Mahalaxmi Express rescue: 500 people have been rescued till now. #Maharashtrapic.twitter.com/dQ1b4pZVIC
— ANI (@ANI) July 27, 2019
मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांमध्ये काल रात्रीपासून अडकली आहे. प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक हजार प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांना बदलापूर येथे नेण्यात येणार असून, तेथून त्यांना त्यांच्या घरांकडे रवाना करता येईल. ज्या प्रवाशांना कोल्हापूरला जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी कल्याण येथून विशेष ट्रेन सुटणार आहे.
Central Railway, Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: Evacuated passengers being lodged at safe places from where they will be moved to Badlapur. #Maharashtrapic.twitter.com/Henh9TkmAf
— ANI (@ANI) July 27, 2019