लोकसभा निवडणुकीसाठी ५० हजार कर्मचाऱ्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:13 AM2019-01-08T03:13:13+5:302019-01-08T03:13:41+5:30
सात हजार मतदान केंद्रे : कर्मचारी न देणाºयांवर गुन्हे दाखल करणार
ठाणे : लोकसभेच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. यानुसार, जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांसाठी सुमारे ५० हजार कर्मचाºयांचे नियोजन केले असून या कामासाठी बँकांसह सरकारी, निमसरकारी आणि केंद्र शासनाच्या कार्यालयांनी अद्यापही कर्मचारी दिले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयांवर लवकरच फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी सुरू झाली आहे. बहुतांश अधिकारी, कर्मचाºयांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये सात हजार मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यासाठी लागणाºया कर्मचारी, अधिकाºयांसह निवडणुकीच्या विविध कामांसाठी ५० हजार कर्मचाºयांचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी, निमसरकारी, केंद्र शासन, सर्व शाळा, महाविद्यालये आणि बँकांमधील अधिकारी, कर्मचाºयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने केली.
आधी नोटीस, नंतर होणार कारवाई
च्निवडणूक कामांसाठी संबंधित आस्थापनांनी पाठवलेल्या कर्मचाºयांचा आढावा शनिवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, सिडको प्राधिकरण अधिकारी संदीप माने आदींनी घेतला.
च्यावेळी बहुतांश आस्थापनांनी दिलेल्या मुदतीत कर्मचाºयांची नावे पाठवली नसल्याचे निदर्शनास आले. याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून संबंधित आस्थापना अधिकाºयांना प्रथम नोटीस दिली जाईल.
च्त्यानंतर, आलेला खुलासा समाधानकारक नसल्यास कार्यालयप्रमुखावर सरकारी व निवडणुकीच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणाखाली फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.