भाजी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे 50 हजारांची आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 03:51 PM2017-09-11T15:51:08+5:302017-09-11T15:52:37+5:30
विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली.
कल्याण दि.11 - विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत 80 टक्के भाजलेल्या तिवारी यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. घरातील मुख्य कमवता व्यक्ती गेल्याने तिवारी कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. कल्याण जिल्हा भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी थेट उर्जामंत्र्यांशी बोलून या कुटुंबाला महावितरणकडून प्राथमिक आर्थिक मदत मिळवून दिली.
आज तिवारी कुटुंबीयांना महावितरणतर्फे तातडीची मदत म्हणून 20 हजार आणि अधिकाऱ्यांनी वर्गणी काढून गोळा केलेले 30 हजार असे 50 हजार रुपये देण्यात आले. यावेळी भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक रमाकांत पाटील, नगरसेविका सुनीता खंडागळे, भाजप पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच या कुटुंबाला लवकरात लवकर आवश्यक ती आर्थिक मदत आणि तिवारी यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.