ठाणे जिल्ह्यातील ५०७ अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई!
By सुरेश लोखंडे | Published: September 11, 2022 07:17 PM2022-09-11T19:17:42+5:302022-09-11T19:18:04+5:30
यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
ठाणे : यंदाच्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीत शेत पिके, बागा, फळबागा व शेतजमिनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यासाठी राज्य शासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आदींव्दारे तीन हजार ५०१ कोटी निधी राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी मंजूर झाला आहे.यामध्ये ठाणे जिल्यातील ५०७ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून लाखोंची भरपाई जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी प्रशासनाने आधी पाच लाखांची तर आॅगस्टमधील नव्या वाढीव दरानुसार १० लाख १६ हजारांची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे.त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी जोरदार पाऊस पडत आहे. दुपारी उन पडत असून संध्याकाळी अचानक वीज आणि ढगांचा गडगडाटात पाऊस पडत असल्यामुळे सध्या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही अंशी खरीप पिकासही फटका बसत आहे. मात्र १ ते १४ जुलैदरम्यान जिल्हह्यात झालेल्या अतिवृष्टीची दखल घेत त्यातील ५०७ शेतकºयांना त्यांच्या ७१.६४ हेक्टर शेतातील विविध स्वरूपाच्या नुकसान भरपाईच्या रकमा आता सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हह्यातील बळी राजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा झालेल्या नुकसानीची भरपाई नवनिर्वाचित सरकारने त्वरीत देण्याचा निर्णय यशस्वी केल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान आहे.
यंदाच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्यासाठी शनिवारी साडेतीन हजार कोटींचा निधी मंजूर करीत राज्य शासनाने सोमवारपासून तो आपत्तीग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची आदेशही जारी केले आहे. यामध्ये वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या हानीसाठी १३ हजार ६०० प्रति हेक्टर भरपाई लागू केल्याची शेतकºयांमध्ये चर्चा आहे. तर बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. यासाठी जिल्हह्यातील ५०७ शेतकºयांच्या नुकसानीचा पंचनामा तयार करून शासनास पाठवण्यात आलेला आहे. त्यास अनुसरूनन ही नुकसान भरपाई शेतकºयांना मिळणार आहे.
जिल्ह्यातील मीरा भार्इंदर, कल्याण, अंबरनाथ,मुरबाड, शहापूर आणि भिवंडी आदी तालुक्यांमध्ये ४८२ शेतकºयांच्या शेतातील ३३ टक्केच्यावर जिरायतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६८.७८ हेक्टरवरील भात पिकाचा समावेश आहे. तर मीरा भार्इंदर, मुरबाड आदी तालुक्यांमधील २४ शेतकºयांच्या २.४६ हेक्टरवरील भाजीपाल्याच्या नुकसानीचा समावेश आहे. तर शहापूरच्या एक शेतकºयांच्या फळबागेच्या नुकसानीची दखल घेऊन त्यास् नियमास अनुसरून भरपाई देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.