ठाणे जिल्ह्यात ५,१०,३०१ मतदार बाद; आता ६४ लाख मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:38 PM2022-01-07T23:38:21+5:302022-01-07T23:38:34+5:30
जिल्ह्यातील पाच लाख 10 हजार 301 मतदार स्थलांतरीत झालेले, छायाचित्र नसल्याच्या कारणांखाली मतदार यादीतून वगळ्यात आले आहे. आता जिल्ह्यात यामध्ये नव्याने एक लाख 70 हजार 699 मतदारांची नोंदणी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील पाच लाख 10 हजार 301 मतदार स्थलांतरीत झालेले, छायाचित्र नसल्याच्या कारणांखाली मतदार यादीतून वगळ्यात आले आहे. आता जिल्ह्यात यामध्ये नव्याने एक लाख 70 हजार 699 मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांसह जिल्ह्यात आता 64 लाख 66 हजार 798 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्याचे ठाणो जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रंसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्र मांनुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी आता करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र मा पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्र मानंतर आता ठाणो जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशिओ) 841 वरून 843 झाले आहे. यासह 5 जानेवारीच्या प्रसिध्द अंतिम मतदार यादीत जिल्ह्यात 64 लाख 66 हजार 798 मतदार आहेत. त्यात महिला मतदारांची संख्या 29 लाख 57 हजार 14 तर पुरूष मतदारांची संख्या 35 लाख 9 हजार 42 आहे. दरम्यान, मतदार नोंदणी कार्यक्र मात एक लाख 70 हजार 699 एवढय़ा मतदारांची वाढ झाली आहे. त्यामध्ये महिला 81 हजार 676 तर पुरूष 88 हजार 784 आहेत व इतर मतदारांची संख्या 239 नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले आठ लाख 35 हजार 508 मतदार होते. मागील एक वर्षामध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी कार्यालयमधील अधिकारी, कर्मचारी, बीएलओंच्या प्रयत्नाने स्थलांतरीत झालेल्या व छायाचित्र नसलेल्या पाच लाख 10 हजार 301 इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका,नगर परिषद व नगर पंचायत यांच्या निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रभावी अमंलबजावणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी नार्वेकर यांनी ठाणो जिल्ह्यातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथील राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र मा दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम, नवीन गृहनिर्माण सोसायटी, वंचित महिला, तृतीयपंथी, आदीवासी पाडे, मोठमोठ्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हास्तरावर घेण्यात आल्या होत्या.