ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५१२ रुग्ण सापडले, ३४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:48+5:302021-06-01T04:30:48+5:30

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ...

512 corona patients found in Thane district, 34 died | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५१२ रुग्ण सापडले, ३४ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५१२ रुग्ण सापडले, ३४ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे सोमवारी ५१२ रुग्ण आढळले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १६ हजार ३६४ बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या नऊ हजार २४८ झाली आहे.

ठाणे शहरात ११२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ९८० झाली. शहरात चार मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ९०१ नोंदण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत १२७ रुग्णांची वाढ झाली असून, १८ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३३ हजार ४५ रुग्ण बाधित असून, दोन हजार पाच मृत्यूची नोंंद झाली आहे.

उल्हासनगरला १७ रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही . येथील बाधितांची संख्या २० हजार ४१५ झाली तर, ४७३ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला तीन बाधित असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४५८ असून मृताची संख्या ४३९ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ९८१ असून, मृतांची संख्या एक हजार २७५ झाली.

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळल्याने आता बाधित १८ हजार २९६ झाले असून, एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ४०७ कायम आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २० हजार ५८४ झाले आहेत. येथेही एकही मृत्यू झालेला नसल्याने मृत्यूची संख्या २५४ कायम आहे. ग्रामीणमध्ये ८५ रुग्णांची वाढ झाली असून, पाच मृत्यू झाले. आता बाधित ३६ हजार ५४८ तर आतापर्यंत ८८८ मृत्यू झाले आहेत.

Web Title: 512 corona patients found in Thane district, 34 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.