मीरा-भार्इंदरमधून ५२ किलो पिशव्या जप्त, पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:32 AM2017-12-18T01:32:13+5:302017-12-18T01:32:38+5:30
कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. कायद्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असून आरोग्यास तसेच पर्यावरणास त्या घातक आहेतच शिवाय पावसाळ्यात याच पिशव्यांमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रकार घडतात. तसे असताना शहरात सर्रास पातळ पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री व वापर केला जातो. महापालिका प्रशासन मात्र या प्लास्टिक माफियांना पाठीशी घालत असून थातूरमातूर कारवाईचे नाटक करते.
मीरा रोड : कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.
कायद्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असून आरोग्यास तसेच पर्यावरणास त्या घातक आहेतच शिवाय पावसाळ्यात याच पिशव्यांमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रकार घडतात. तसे असताना शहरात सर्रास पातळ पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री व वापर केला जातो. महापालिका प्रशासन मात्र या प्लास्टिक माफियांना पाठीशी घालत असून थातूरमातूर कारवाईचे नाटक करते.
पालिकेकडून ठोस कारवाई होत नसतानाच आता खुद्द मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशननेच पिशव्यांविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेचे सुकेतू नानावटी व अन्य पदाधिकारी आदींनी कायद्याने बंदी असताना प्लास्टिक पिशव्या विकणाºयांची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागास देण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी संस्थेचे पदाधिकारी व स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांनी क्विन्स पार्क व परिसरातील राकेश शाह यांच्या जे. आर.पॅकेजरी, मुकेश चौधरी यांच्या रॉयल कलेक्शन व ओमप्रकाश पटेल यांच्या दुकानांमध्ये छापा टाकून सुमारे ५२ किलो बंदी असलेल्या पिशव्या जप्त केल्या.