२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:36 AM2018-02-19T00:36:58+5:302018-02-19T00:37:01+5:30
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
ठाणे : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. २५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी १०४ बॅलेट व कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.
मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. या ग्रामपंचायतींसाठी ४१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी १२ केंद्रांची निवड केली आहे. या केंद्रांवर भिवंडी तालुक्यातील पाच पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. अंबरनाथ व ठाणे प्रत्येकी एक ग्रामपंचायत आणि शहापूरच्या चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी पाच मतदान केंद्रांची निवड निश्चित झाली आहे.
सोयीसुविधांचा आढावा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तहसीलदारांची यंत्रणा घेत आहेत. मुरबाडच्या ग्रामपंचायतींसाठी ८० बॅलेट युनिट मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत. ठाण्यासाठी केवळ एक, तर अंबरनाथमधील ग्रामपंचायतींसाठी दोन बॅलेट युनिट वापरण्यात येतील. भिवंडी व शहापूरच्या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी१० बॅलेट युनिट मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे.