खोणी येथे ५४ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:42+5:302021-07-14T04:44:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरांतर्गत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने पलावा उत्सव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिरांतर्गत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने पलावा उत्सव मंडळ, खोणी गाव येथे रविवारी झालेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात पलावा फेज २ येथील ५४ नागरिकांनी रक्तदान केल्याची माहिती खोणी ग्रामपंचायत सदस्य व उपक्रमाचे आयोजक हनुमान ठोंबरे यांनी दिली.
कोविडकाळात रक्ताचा तुटवडा जाणवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या सामाजिक कार्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत कल्याण लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर भरवण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार डोंबिवली, खोणीतील पलावा फेज २ येथे रविवारी रक्तदान शिबिर पार पडले.
खोणी येथे प्लाझ्मा रक्तपेढीच्या माध्यमातून झालेल्या शिबिरात युवक, महिला, पुरुष अशा सगळ्या वयोगटांतील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पलावा उत्सव मंडळाचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ठोंबरे यांच्यासह अभिजित गुरव, कृष्णा गोसावी, संजय बोरे, संजय सावंत, गजेंद्र कदम, आनंद वाळंजू, निषाद अली, चिरोदीप बसू, श्रीकुमार यांचा त्यात समावेश होता. दरम्यान, आगामी काळातही अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-----------