कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनच्या ५४ हजार लसी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:36+5:302021-08-27T04:43:36+5:30

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. ...

54,000 covacin vaccines available with covshield | कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनच्या ५४ हजार लसी उपलब्ध

कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनच्या ५४ हजार लसी उपलब्ध

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. त्यास अनुसरून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत ५३ हजार ८१० लसी जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील गावखेडय़ांसह अंबरनाथ व कुळगाव बदलापूर या दोन नगरपरिषदांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत लसीचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे, तर ठाणे मनपा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर आणि नवी मुंबई आदी महापालिकांच्या आरोग्य यंत्रणेद्वारे लसीचा साठा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये ३५ हजार ३९० कोविशिल्ड व १८ हजार ४२० कोव्हॅक्सिन लसीचा साठा २२ ते २४ ऑगस्टदरम्यान उपलब्ध झाला आहे. उपलब्ध लसीद्वारे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

* शहरनिहाय उपलब्ध साठा...

शहर - कोविशिल्ड- कोव्हॅक्सिन- एकूण साठा,

1) डीएचओ- ७२६० - १०९० - ८३५०,

2) कल्याण डोंबिवली - ७२००- ३९१०- ११११०,

3) उल्हासनगर- २९३० - २९१०- ५८४०,

4) भिवंडी- १८५०- २१९० - ४०४०,

5) ठाणे - ६७५०- १८३० - ८५८०,

6) मीरा भाईंदर- ८०५० - ४९००- १२९५०,

7) नवी मुंबई- १३५० - १५९०- २९४०,

--

Web Title: 54,000 covacin vaccines available with covshield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.