५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By Admin | Published: February 20, 2017 05:33 AM2017-02-20T05:33:26+5:302017-02-20T05:33:26+5:30

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोघा जवाहिरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या

55 lakh old notes were seized | ५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

५५ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

googlenewsNext

कल्याण : हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोघा जवाहिरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या दोघांकडून ५५ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली आहे. मीरा-भार्इंदरहून नोटा बदलण्यासाठी ही दुकली डोंबिवलीला आली होती.
गुरमितसिंग राजिंदरसिंग बारज (वय२६) आणि जयमीन अरविंदभाई गोरा अशी दोघांची नावे आहेत. हे दोघे मीरा-भार्इंदर येथे राहतात. नोटाबदलीच्या बदल्यात या दोघांना ५० टक्के कमिशन मिळणार होते. या नोटा कुणाकडून बदली करून घेण्यात येणार होत्या, डोंबिवलीत अशा नोटा बदली करून देणारे कोण आहेत, नोटा बदली करून देणारी व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे कातसेचठाणे, उल्हासनगर आणि मुंबई महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार संपायच्या आदल्यादिवशी हा प्रकार उघड झाल्याने हा पैसा मतदारांसाठी बदली करून घेतला जाणार होता का, असे विविध प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाले आहेत.
चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्यासाठी दोघे व्यापारी डोंबिवलीत येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर, राजेंद्र खिल्लारे, दत्ताराम भोसले, हरिश्चंद्र बंगारा, अजित राजपूत, नरेश जोगमार्गे यांच्या पथकाने कल्याण-शीळ मार्गावरील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता यातील बारज याच्याकडून ३६ लाख, तर गोरा याच्याकडून १९ लाख ५० हजारांच्या चलनातील बाद झालेल्या जुन्या नोटा असलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दोघांची गुन्हे अन्वेषण विभागाकडून कसून चौकशी करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
पुढील तपास आयकर विभागाकडे
या नोटांव्यतिरिक्त आणखी किती जुन्या चलनातून बाद झालेल्या नोटा दोघांनी वटवल्या आहेत, आणखी कुणी यात सहभागी आहेत का, याचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंतच्या तपासात दोघेही जवाहीर असून व्यवहारातून त्यांनी या नोटा जमवल्या होत्या. या बाद झालेल्या नोटांप्रकरणी त्यांना ५० टक्केकमिशन मिळणार होते, ही माहिती समोर आली आहे. पुढील तपास आयकर विभाग करणार असल्याचे नगरकर यांनी सांगितले.

Web Title: 55 lakh old notes were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.