कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ५५० टीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:53 AM2021-02-20T05:53:53+5:302021-02-20T05:53:53+5:30
ठाणे : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या असून, ज्याठिकाणी ...
ठाणे : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या असून, ज्याठिकाणी गृहविलगीकरणाची सुविधा नसेल तेथील जोखीम गटातील व्यक्तींना महापालिका विलगीकरण कक्षात सक्तीने विलगीकरण करण्याच्या सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले, तसेच ५५० टीम सज्ज केल्या असून, त्यांच्यामार्फत यावर लक्ष दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकामागे ४० जणांना केले जाणार ट्रेस, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करणार
नव्या संभाव्य कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विलगीकरण कक्ष, कोविड केअर सेंटर्स पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन केले असून, आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिग्रहित करण्यात येणार आहेत. याबाबत शहरातील डॉक्टर्स, त्यांच्या संघटना यांच्याशी समन्वय सुरू आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्यांसाठी आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळा व्यवस्थापनांशीही चर्चा सुरू असून, शहरात जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात, याचे नियोजन केले आहे.
-कोविड वॉर रूम सज्ज
महापालिकेचे वॉर रूम आणि मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष आता पूर्ण क्षमतेने सुरू केला असून, रुग्णवाहिका व्यवस्थापन आणि बेड व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत केली आहे. यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे.