ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 558 रुग्ण आढळले; 33 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 09:48 PM2021-06-06T21:48:56+5:302021-06-06T21:49:17+5:30
उल्हासनगरमध्ये 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण 20 हजार 609 रुग्णांची व 477 मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे 558 रुग्ण रविवारी आढळून आले आहे. गेल्या 24 तासात 33 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख 21 हजार 607 बाधीत व नऊ हजार 478 मृतांची नोंद करण्यात आली आहे. ठाणे शहर परिसरात 1240 रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख 31 हजार तीन रुग्णांची व एक हजार 918 मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत 146 रुग्ण सापडले असून 22 मृत्यू झाले आहे. येथील एकूण एक लाख 33 हजार 941 बाधितांसह दोन हजार 135 मृतांची नोंद केली आहे.
उल्हासनगरमध्ये 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण 20 हजार 609 रुग्णांची व 477 मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या 10 हजार 505 व 445 मृत्यू आजपर्यंत नोंदले आहेत. मीरा भाईंदरला दिवसभरात 65 बाधितांसह तीन मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आजपर्यंत 49 हजार 394 बाधीत व एक हजार 291 मृतांची नोंद झाली. अंबरनाथला 21 बाधीत आज सापडले असून एकाचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्ण संख्या 19 हजार 407 बाधीत व 411 मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूर नगर परिषदेत 20 रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील 20 हजार 721 बाधितांची व 254 मृतांची नोंद आजपर्यंत झाली. ग्रामीण गांवपाड्यांत आज 74 रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. या परिसरातील बाधितांची संख्या 37 हजार 475 असून मृत्यू 910 नोंदले गेले आहेत.