५६ रुग्णांना अवाजवी बिले दिली, ठामपा आयुक्तांनी खासगी रुग्णालयाची मान्यता रद्द केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 04:23 PM2020-07-25T16:23:04+5:302020-07-25T16:23:43+5:30
रुग्णांना अवाजवी बिल देणाऱ्या एका खासगी रुग्णालयाला ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिला आहे.
ठाणे - रुग्णांना अवाजवी बिल देणाऱ्या एका खासगी रुग्णालयाला ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. होरायझन प्राईम हॉस्पिटल, घोडबंदर रोड या रुग्णालयाची कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केलेली मान्यता रद्द करण्यात आळी आहे. त्यासोबत रूग्णालयाची नोंदणी देखील एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची धडक कारवाई केली आहे. वाढीव बिले आकारली गेली असल्याने पालिका प्रशासनाने नोटीस दिली होती. आणि त्यानंतरदेखील रुग्णालय प्रशासनाने उत्तर न दिल्याने पालिकेने कारवाई केली आहे. सध्या या रुग्णालयावर 2 पालिका अधिकाऱ्यांचे पथक 24 तास नेमण्यात आले असून, आता उपचार घेत असलेले रुग्ण बरे होई पर्यंत कार्यरत राहील.