ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५६८ रुग्ण आढळले; केवळ आठ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 10:41 PM2020-11-13T22:41:49+5:302020-11-13T22:42:21+5:30
corona Virus news: मृतांची संख्या पाच हजार ५०९ झालेली आहे, असे जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी ५६८ रुग्णं आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख १८ हजार ५६८ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आठ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या पाच हजार ५०९ झालेली आहे, असे जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे.
ठाणे शहर परिसरात १३५ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आता ४८ हजार ५९० रुग्ण झाले आहेत. आज दोन मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार १८६ नोंदली आहे. कल्याण - डोंबिवलीत १५८ रुग्ण आढळून आले असून दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे ५१ हजार ५५१ रुग्ण बाधीत असून मृतांची संख्या एक हजार २६ झाली आहे.
उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील दहा हजार ४५६ रुग्ण संख्येबरोबर मृत्यू ७४४ नोंदले आहेत. भिवंडीला नऊ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत सह हजार ८० झाले असून ३३८ मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५९ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात २३ हजार ३३८ बाधितांसह आता मृतांची संख्या ७४४ आहे.
अंबरनाथमध्ये १९ रुग्णं सापडले, तर आज दोन मृत्यूची नोंद आहे. येथे बाधितांची संख्या सात हजार ५७७ असून मृत्यू २८१ नोंद झाले आहेत. बदलापूरला ३० रुग्णांचा शोध घेण्यात आल्यामळे बाधीत सात हजार ६२२ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ९८ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये १७ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या परिसरात १७ हजार ३७३ बाधितांसह ५५२ मृतांची नोंद आतापर्यंत आहे.